For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर कोकण रेल्वेची ‘रेंट अ बाईक’ निविदा रद्द

12:15 PM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर कोकण रेल्वेची ‘रेंट अ बाईक’ निविदा रद्द
Advertisement

मडगाव : कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून गोव्यातील विविध स्थानकांवर तसेच कर्नाटकातील तीन स्थानकांवर ‘रेंट अ बाईक’ ही सेवा देण्यासाठी निविदा जारी करण्यात आली होती. स्थानिक व्यावसायिकांसह राजकीय पक्षांचा तिला विरोध झाला. दरम्यान मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही निविदा रद्द करण्यात आलेली आहे. रेल्वे स्थानकावर ‘रेंट अ बाईक’ सुरू झाल्यास स्थानिकांच्या पोटावर पाय येणार असल्याने राज्य सरकारने दखल घेत ही निविदा मागे घेण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी स्थानिक रेंट अ बाईक व्यावसायिकांनी, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासह इतरांनी केली होती. दक्षिण गोवा व उत्तर गोवा रेंट अ बाईक असोसिएशनतर्फेही हीच मागणी करण्यात आली होती. गोव्यातील मडगाव, थिवी, करमळी, काणकोण यासह कर्नाटक राज्यातील कारवार, गोकर्ण रोड आणि कुमटा रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुऊ होणार होती. सर्व सात स्थानकांवर एकाच कराराद्वारे रेंट ए बाइक चे कंत्राट चालवले जाणार होते.  ही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी तथा उपप्रबंधक बबन घाटगे यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.