महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर तीन दिवसांच्या घसरणीला विराम!

06:34 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 218 अंकांनी वधारला : बँकिंग व वाहन क्षेत्रात चमक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील समभागांमधील नफ्यामुळे तीन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वी, सतत विदेशी गुंतवणूकदार बाहेर पडल्यामुळे बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीसोबत सुरु झाला होता. मात्र अंतिम क्षणी बाजारात तेजीची नोंद झाली आहे.

बीएसई सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रात इंट्राडे दरम्यान 570.45 अंकांनी घसरून 80,436.16 वर होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 178.3 अंकांनी घसरून 24,571.55 अंकांवर राहिला होता. मात्र शेअर बाजाराने दुपारच्या सत्रापासून  तेजीकडे वाटचाल चालू केली आणि सुरुवातीच्या घसरणीतून बाजार सावरताना दिसला.

अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 218.14 अंकांनी किंवा 0.27 टक्क्यांनी वधारुन वाढून 81,224.75 वर बंद झाला. दुसरीकडे, एनएसई fिनफ्टी 104.20 अंकांच्या तेजीसोबत 0.42 टक्क्यांनी वाढून 24,854.05 वर बंद झाला.

हे समभाग तेजीत

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभाग वधारुन बंद झाले आहेत. यामध्ये अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि एनटीपीसी हे सेन्सेक्समध्ये पहिल्या पाचमध्ये तेजीत राहिले आहेत. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, एचडीएफसी बँक, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एल अँड टी, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, रिलायन्स आणि एम अँड एम यांचे समभाग वधारले.

हे समभाग घसरणीत

अन्य कंपन्यांमध्ये दुसरीकडे, सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 12 समभाग प्रभावीत होत बंद झाले. इन्फोसिस, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीत अव्वल स्थानी राहिले आहेत. यासोबतच एचयूएल, टायटन, आयटीसी, मारुती, पॉवरग्रिड, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग घसरले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी 7,421.40 कोटी रुपयांचे समभाग विकले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article