Satara Crime : अखेर तब्बल दीडशे गुन्हे दाखल असलेला चोरटा जेरबंद !
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती
सातारा : सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डी. बी. पथक) आंतरराज्य वाहनचोर टोळीतील अट्टल आरोपीला अटक करून तब्बल ७३ लाख रुपये किमतीच्या ७ चारचाकी, ४ दुचाकी आणि ६ वाहनांच्या चेसीस प्लेट्स असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित आरोपीचे नाव नागेश हणमंत शिंदे (वय ३१, रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी १५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील चिकोडी, निपाणी, सदलगा या भागांत गेल्या काही महिन्यांपासून चारचाकी व दुचाकी वाहनचोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरींमध्ये एकाच व्यक्तीचा हात
असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले. त्या आधारे सातारा शहर डी. बी. पथकाने सखोल तपास केला असता नागेश शिंदे याची ओळख पटली. दोन महिन्यांपासूनत्याच्या मागावर सातारा पोलीस होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकाने वाढे फाटा परिसरात पेट्रोलिंगदरम्यान संशयित म्हणून एकास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
त्याच्याकडून जप्त केलेली वाहनेसातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्प्लेंडर एम.एच.११ए.व्ही. ३२५२, स्प्लेंडर एम.एच. ११ डी.सी. ८२२८,स्प्लेंडर एम.एच. ११ बी.सी. ९७२०, म्हसवड पोलीस ठाणे इको कार एम.एच. ०८ आर. ७०६६, निपाणी पोलीस ठाणे बोलेरो पिकअप के.ए. २३ ए. ८२४४, सदलगा पोलीस ठाणे एव्हिएटर के.ए.२३ ई.एफ ०९४५, चिकोडी पोलीस ठाणे व्हॅगनआर एमएच. ०९ ए.क्यु. १२०८,
कागल पोलीस ठाणे अल्टो कार एम. एच. १२ डी. वाय. ३१७२, पंढरपूर पोलीस ठाणे बोलेरो पिकअप एम. एच. १० बी. आर. २५७२, सांगली पोलीस ठाणे मारुती ८०० एमएच. ०९ ए.क्यु. ०२३९ ही हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडून ६ चेसीस हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून चौकशीत शिंदे याने कर्नाटकसह महाराष्ट्रातील विविध पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. नि. श्याम काळे, पो.उ.नि. सुधीर मोरे, तसेच पोलीस जवान सुजीत भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांच्या पथकाने केली.