महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कावळेवाडी येथील स्मशानभूमी वादावर अखेर तोडगा

10:51 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

313 सर्व्हे नंबरमधील 33 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी मंजूर करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

कावळेवाडी गावात गेल्या सहा वर्षांपासून स्मशानभूमीबद्दल वाद सुरू होता. अखेर या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ मंडळ व गावकऱ्यांची यासंदर्भात कावळेवाडीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला आहे. गावाजवळ असणारी 313 सर्व्हे नंबरमधील 33 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी प्रशासनाने मंजूर करून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी होकार दिला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी बेळगाव   प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी सदर जागा सरकारकडून लवकरात लवकर मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे सीपीआय हिरेमठ, तहसीलदार नागराळ, पीडीओ रविकांत,  सर्कल व तलाठी आदी अधिकारी तसेच अॅड. नामदेव मोरे, मोहन मोरे, ज्योतिबा मोरे, कल्लाप्पा यळ्ळूरकर, रघुनाथ मोरे, मोनाप्पा यळ्ळूरकर, देवेंद्र गावडा, केदारी कणबरकर, अनंत बाचीकर, यशवंत मोरे, हणमंत यळ्ळूरकर आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article