कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर तीन दिवसांच्या तेजीला विराम

06:28 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 155 तर निफ्टी 81 अंकांनी प्रभावीत : आर्थिक समभागांमध्ये विक्री

Advertisement

मुंबई :

Advertisement

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात मागील तीन दिवसांच्या तेजीला पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये जागतिक बाजारांमध्ये मिळताजुळता कल राहिला. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक यांच्या समभागांमध्ये नफा वसुली झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही नुकसानीसह बंद झाले.

मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्स 80,907.24 वर मजबूतपणे सुरु झाला. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 155.77 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 80,641.07 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 81.55 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 24,379.60 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये इटर्नल, स्टेट बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट यांचे समभाग हे सर्वाधिक 1.94 ते 3.15 टक्क्यांपर्यंत घसरणीत राहिले. दुसऱ्या बाजूला भारती एअरटेल, टाटा स्टील, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग 1.66 टक्क्यांनी वधारुन बंद झाले.

दुसऱ्या सत्रात मंगळवारी अस्थिर स्थिती असतानाही नफा वसुली झाल्याने फायनान्शिअल समभागांमध्ये घसरण राहिली. यासह बँक ऑफ बडोदाच्या नकारात्मक तिमाही निकालाचाही परिणाम बाजारावर राहिला. दुसऱ्या बाजूला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम येत्या काळात भारतीय शेअर बाजारावर राहणार असल्याचे संकेत निर्माण होत आहेत. यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमधील संबंध कसे प्रस्थापित होणार यावर पुढील समीकरणे निश्चित होणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

जागतिक स्थिती काय?

जगातील बाजारांमध्ये अमेरिकेच्या समभागात वॉलस्ट्रीटचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले. दरम्यान औद्योगिक तंत्रज्ञानावर आधारीत नॅस्डॅक 0.74 टक्क्यांनी खाली राहिला. एस अॅण्ड पी 0.64 टक्के खाली, डाऊजोन्स 0.24 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत. आशियातील बाजारांमध्ये जपान आणि दक्षिण कोरियाचा बाजार बंद होतो. चीनमधील बाजार एक दिवसांच्या सुट्टीनंतर परत सुरु झाला.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article