For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

10:45 AM Nov 22, 2024 IST | Radhika Patil
दहावी बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
Final schedule for 10th-12th exams announced
Advertisement

कोल्हापूर : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावी फेब्रु-मार्च 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ दोन्ही परिक्षांच्या तयारीला लागले आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Advertisement

बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान पूर्ण होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. या परिक्षांसाठी 176 केंद्रांवर 41 परीरक्षकांची नेमणूक केली आहे. दहावी परीक्षा 357 परीक्षा केंद्रावर होणार आहे. बारावी परीक्षेसाठी आजअखेर 1 लाख 16 हजार 128 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. तर दहावी परीक्षेसाठी 1 लाख 30 हजार 844 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला आहे. विलंब शुल्काने बारावीसाठी 22 नोव्हेंबरपर्यंत तर दहावीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जादा वेळ, लेखनिक, जवळचे परीक्षा केंद्र या सवलती मिळण्यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले आहेत. दहावी-बारावी परिक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी परिक्षक, नियामक नियुक्तीचे काम सुरु आहे. परिक्षेसाठी परिक्षक, केंद्रसंचालक नियुक्ती सुरु आहे. तसेच विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चिती करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली. तसेच दहावी बारावी परिक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असल्याने शाळांनी आवश्यक ती पूर्वतयारी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी सराव प्रश्नपत्रिका सोडवणे व अभ्यास करण्यास प्राधान्य दिले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.