कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंतिम पांघल उपांत्य फेरीत

06:12 AM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्योती, राधिका यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था / झाग्रेब (क्रोएशिया)

Advertisement

अंतिम पांघलने शेवटच्या क्षणी चीनच्या जिन झांगाविरुद्ध निर्णायक टेकडाऊन चाल चालवली आणि महिलांच्या 53 किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा जिवंत राहिल्या. परंतु राधिका आणि ज्योती बेरीवाल बुधवारी येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर पडल्या.

दुसरे जागतिक अजिंक्यपद पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवणारी तरुण अंतिमने तिच्या मोहीमेची सोपी सुरूवात केली जेंव्हा तिने स्पेनच्या कार्ला जौमे सोनरला फक्त 23 सेकंदांत नॉकआऊट केले. परंतु झांगमध्ये तिला एक कठीण प्रतिस्पर्धी सापडला. जिच्यावर तिने 9-8 अशी आघाडी घेतली. अंतिमने डबल लेग टेकडाऊनसाठी झांगला ऑफ बॅलन्स करताना दोन पॉइंटरसह खेळ केला. भारतीय खेळाडूने हेडलॉक चालीने तिची आघाडी दुप्पट केली. परंतु झांगने तिच्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला. बॉडीलॉक पोझिशनमधून वर्तुळाच्या काठावर असलेल्या आणखी एका दोन पॉइंटरने अंतिमला 6-0 अशी आघाडी दिली. झांगने तिच्या पहिल्या स्कोअरिंग चालीने अंतर 2-6 पर्यंत कमी केले आणि अधिक नुकसान करु शकली असती परंतु चिनी खेळाडूला लेग लेस वापरण्यासाठी योग्य पकड मिळवता आली नाही.

दुसऱ्या सत्रात झांगने हेडलॉकने अंतिमला रोखले. तिने उजव्या पायाच्या हालचालीने अंतर आणखी कमी केले आणि अंतिमला रोल करत गुणांची बरोबरी केली. झांगने पिन करण्याचा प्रयत्न केला पण अंतिम बाहेर पडली. तरीही चिनसेने तिच्या प्रयत्नांसाठी आणखी दोन गुण मिळवले आणि 8-6 अशी आघाडी घेतली. अंतिमने झांगला धक्का देवून तिच्या गुणांमध्ये आणखी एक गुण जोडला. 20 सेकंदांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना अंतिमला एका चांगल्या चालीची आवश्यकता होती आणि तिने फक्त तीन सेकंद शिल्लक असताना हे मिळवले.

अंतिम आता पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या इक्वेडोरच्या लुसिया येपेझ गुझमनविरुद्ध खेळत आहे. मनीषा भानवालाला उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाच्या ओके जू किमकडून 0-8 असा पराभव पत्करावा लागला. जर किम अंतिम फेरीत पोहोचली तर मनीषाला रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी मिळेल. तथापि, राधिका (68 किलो) आणि ज्योती (72 किलो) यांनी प्रगती केली नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article