महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू काश्मीरमध्ये आज मतदानाचा अंतिम टप्पा

10:10 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सात जिल्ह्यातील 40 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात 39.18 लाख मतदारांना आपला मताधिकार बजावता येणार आहे. या टप्प्यातील 40 जागांपैकी 24 जागा जम्मू विभागातील आणि 16 काश्मीर खोऱ्यातील आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या टप्प्यात 415 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 387 पुऊष आणि 28 महिला उमेदवार आहेत.

काश्मीरमधील 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी 24 विधानसभा जागांवर 61.38 टक्के मतदान झाले. तर 25 सप्टेंबर रोजी 6 जिल्ह्यांमधील 26 विधानसभा जागांवर 57.31 टक्के मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शेवटच्या टप्प्यात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) 33 जागांवर निवडणूक लढवत आहे. युती करून निवडणूक लढवत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेसने 24 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे 29 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. तसेच 155 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

तिसऱ्या टप्प्यात 169 उमेदवार लक्षाधीश असून 67 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. नगरोटा, जम्मू येथील भाजपचे उमेदवार देवेंद्र सिंह राणा यांच्याकडे सर्वाधिक 126 कोटी ऊपयांची संपत्ती आहे. या टप्प्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अफझल गुरूचा मोठा भाऊ एजाज अहमद गुरू हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एजाज गुऊ हे सोपोर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत. तसेच खासदार इंजिनियर रशीद यांचे भाऊ खुर्शीद अहमद शेख उत्तर काश्मीरच्या लंगेट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसेन बेग बारामुल्लामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article