For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलएस-ठळकवाडी यांच्यात आज अंतिम लढत

10:16 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलएस ठळकवाडी यांच्यात आज अंतिम लढत
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 15 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलएसने केएलई इंटरनॅशनलचा 9 गड्यांनी तर ठळकवाडीने ज्ञान प्रबोधन मंदिरचा 8 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सोहम पाटील, ज्ञानेश्वर मोरे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्व गडीबाद 91 धावा केल्या. त्यात आरुष कुलकर्णीने 19 तर अब्रार काद्री व अतित भोगण यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. सोहम पाटीलने 11 धावात 3, सुरेंद्र पाटील व ऋषीकेश बंगोडी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 13.4 षटकात एक गडी बाद 92 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात सुरेंद्र पाटीलने 4 चौकारासह नाबाद 41 तर सोहम पाटीलने 2 चौकारासह नाबाद 25 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 83 धावा केल्या. त्यात प्रज्योत उघाडेने 16, श्री हुंदरेने 15 धावा केल्या. ज्ञान प्रबोधन मंदिरतर्फे आयुष सरदेसाईने दोन गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्ञान प्रबोधन मंदिरने 20 षटकात 9 गडी बाद 75 धावाच केल्या. त्यात आयुष अणवेकरने 26, तर योगीराज तेंडुलकरने 11 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे ज्ञानेश्वर मोरेने 16 धावात 4 तर प्रज्योत उघाडे व विराज यांनी एक गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.