For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक-राजस्थान यांच्यात अंतिम लढत उद्या

10:34 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक राजस्थान यांच्यात अंतिम लढत उद्या
Advertisement

बेळगाव : भारतीय फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, कर्नाटक फुटबॉल संघटना व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित ज्युनिअर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यातून कर्नाटक संघाने आसाम संघाचा 5-3 तर राजस्थानने अटितटीच्या लढतीत सिक्कीमचा ट्रायब्रेकरमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. सिक्कीमच्या सीता सुनंदासने सलग तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक केली. पण पराभव टाळू शकली नाही. येथील लव्हडेल स्कूलच्या मैदानावरती ज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीच्या समान्यात कर्नाटकाने आसामनचा 5-3 असा पराभव केला. या सामन्यात 23 व्या मिनीटाला कर्नाटकाच्या अद्विका राणोजीयाच्या पासवर रितू श्रीनंदनने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 41 व्या मिनीटाला रितूच्या पासवर मैत्रयी पालासुंदरमने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली.

Advertisement

47 व्या मिनीटाला आसामनच्या आरती मुंडाच्या पासवर रिपाराणी ब्रम्हाने गोल करुन 1-2 अशी आघाडी पहिल्या सत्रात कमी केली. दुसऱ्या सत्रात 63 व्या मिनीटाला आसामच्या रिपाच्या पासवर सेरीका तरंगप्पीने दुसरा गोल करुन 2-2 अशी बरोबरी साधली. 68 व्यामिनीटाला कर्नाटकाच्या तन्वी नायरच्या पासवर मैत्रयीने तिसरा गोल केला तर 80 व्या मिनीटाला रितुच्या पासवर तन्वी नायरने चौथा गोल करुन 4-2 अशी आघाडी मिळविली. 82 व्या मिनीटाला कर्नाटकाच्या तन्वीच्या पासवर अद्विका कानोजीयाने पाचवा गोल करुन 5-2 अशी आघाडी मिळविली. सामन्याच्या जादा वेळेत आसामच्या आरती मुंडाने गोल करुन 3-5 अशी आघाडी कमी केली. या सामन्यात कर्नाटकाने आक्रमक व सुंदरपासव्दारे बलाढ्या आसाम संघाला पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना राजस्थान विरुद्ध सिक्कीम या सामन्याचे उद्घाटन बेळगाव फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, एस. एस. नरगोडी, आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंच्या संघाची ओळख करुन करण्यातआली. या सामन्यात दोन्ही संघांनी सुरूवातीपासूनच आक्रमक चढाया सुरू केल्या. 31 व्या मिनिटाला राजस्थानच्या लिचिमी कनवारच्या पासवर कनवारने गोल करुन 1-0ची आघाडी मिळवून दिली. 40 व्या मिनीटाला सिक्कमीची कर्णधार सुंदासने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात 62 व 71 व्यामिनीटाला स्मिता सुंदासने सलग गोल करुन 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. राजस्थानने शेवटच्या क्षणी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करुन 83 व्या मिनीटाला बालुप्रियाने दुसरा तर 87 व्या मिनीटाला लिचिमी कनवारने तिसरा गोल 3-3 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली.

Advertisement

निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचे गोल फलक समान असल्याने पंचांनी जादावेळ नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते अपशयी ठरले. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये राजस्थान 7-6 अशा गुणफरकाने विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानतर्फे संजू कनवार, लिचिमी कनवार, मंजू कनवार, संतोषा कनवार यांनी गोल केले. तर सिक्कीमतर्फे स्मिता सुंदास, हिल्दामीत लिपीची व सुचिता शुभा यांनी गोल केले. अंतिम सामना शुक्रवार दि. 9 रोजी कर्नाटक व राजस्थान यांच्यात खेळविला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.