कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक

06:22 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात कारवाई : पत्नीविरुद्धही लूकआऊट नोटीस जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना रविवारी मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्तपणे अटक केली. त्यांच्यावर उदयपूरमधील एका व्यावसायिकाला 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांना मुंबईतील यारी रोड परिसरातील गंगा भवन अपार्टमेंटमधील मेहुण्याच्या फ्लॅटमधून अटक केली. राजस्थान पोलीस त्यांना उदयपूरला घेऊन जाण्यासाठी वांद्रे न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्याची तयारी करत होते.

राजस्थानमधील इंदिरा ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक डॉ. अजय मुरडिया यांनी विक्रम भट्ट यांच्यासह आठ जणांविरुद्ध 17 नोव्हेंबर रोजी 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सात दिवसांपूर्वी उदयपूर पोलिसांनी विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट आणि इतर सहा आरोपींविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली होती. सर्व आरोपींना 8 डिसेंबरपर्यंत उदयपूर पोलिसांसमोर हजर राहण्याच्या नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. शिवाय, आता कोणताही आरोपी परवानगीशिवाय परदेशात प्रवास करू शकणार नाही. तथापि, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना अद्याप या प्रकरणात कोणतीही सूचना मिळालेली नाही. आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे या प्रकरणाची माहिती मिळाली, असे चित्रपट निर्मात्याने सांगितले.

Advertisement
Next Article