महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चित्रपट उद्योग वाढतोय वेगाने : प्रिथुल कुमार

12:22 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मूल्यांकनाची प्रक्रिया विस्तृत आणि स्पष्टपणे निश्चित केली आहे, कारण हा करदात्यांचा पैसा आहे जो या चित्रपटांच्या निर्मितीसाठी वापरला जातो. गेल्या 10 वर्षांपासून, एनएफडीसीद्वारे निर्मित चित्रपटांची संख्या तशी कमी आहे कारण आता इतर स्त्राsतांकडून वित्तपुरवठा होत आहे आणि चित्रपट उद्योग वेगाने वाढत आहे म्हणून अशा निधीची आवश्यकता उरलेली नाही. सिनेमा आणि ओटीटीमधून उत्तम आशयाची मागणी वाढत असताना, भारत सरकारनेही सकारात्मक पाऊल टाकत आर्थिक मदतीची रक्कम, 10 पटीने वाढवली असल्याची माहिती प्रिथुल कुमार यांनी दिली. 54व्या आंचिममध्ये आयोजित केलेल्या इन कर्न्व्हसेशन सत्रात बोलताना दिली. शारिक पटेल म्हणाले, तोटा होण्याची शक्मयता अधिक असलेला असा हा व्यवसाय आहे, जिथे यशाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, परंतु नफा मिळविण्यासाठी, एखाद्याने ते चिवटपणे चालू ठेवले पाहिजे आणि आपले कौशल्य वाढवत राहिले पाहिजे. सुनीता टाटी पुढे म्हणाल्या, चांगले न चालणारे चित्रपट बनवणे, हा भविष्यात यशस्वी चित्रपट बनवण्यासाठी शिकण्याचा अनुभव आहे, असे समजले पाहिजे.

Advertisement

चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबद्दल बोलताना, फिरदौसुल हसन म्हणाले, “हा एक चित्रपटांविषयीचे प्रेम, पॅशन असणारा व्यवसाय आहे, त्यामुळे इथे पटकथा नाही, तर कोणत्याही पटकथेच्या मागे असलेली व्यक्ती महत्वाची असते. मी माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी चित्रपट बनवतो फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. आपल्याला इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी पैशांची गरज असते पण आपले संपूर्ण प्राथमिक लक्ष एक चांगला चित्रपट बनवण्यावर असले पाहिजे. त्यातूनच आपल्या प्रॉडक्शन हाऊसला ओळख मिळते. दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांची ओळख निर्माण होते. सिनेमाचा व्यवसाय आणि एखाद्याची आवड यांच्यात समतोल राखणे का आवश्यक आहे यावरही सुनीता टाटी यांनी मार्गदर्शन केले. ‘आम्ही सिनेमाची आवड म्हणून या व्यवसायात आहोत पण सिनेमाचा व्यवसाय समजून घेण्यासाठीही आम्ही वेळ काढतो. या पूर्णपणे दोन भिन्न गोष्टी आहेत आणि या उद्योगात टिकून राहण्यासाठी, केवळ सिनेमाची आवड असणे पुरेसे नाही, तर सिनेमाचा व्यवसाय समजून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article