महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांदा - दाणोली राज्यमार्गावरील खड्डे बुजवा

05:39 PM Oct 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अन्यथा रास्ता रोको करू ; शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

Advertisement

प्रतिनिधी
बांदा
बांदा - दाणोली राज्यमार्गाची ठिकठिकाणी खड्डे पडून अत्यंत दुरावस्था झाली आहे. खड्डे चुकविताना दिवसेंदिवस वाहनांच्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलीआहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्धारे दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, बांदा - दाणोली हा मार्ग पर्यटकांना गोव्याकडे जाण्यासाठी कमी अंतराचा आहे. त्यामुळे या मार्गावरूनदररोज हजारो गाड्या धावत असतात. मात्र, सध्या या रस्त्याचीठिकठिकाणी खड़े पड्ून दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही होत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्याची कोणतीही कार्यवाही करत नसल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये संताप आहे.सदर गंभीर प्रश्नाकडे रियाज खान यांनी सार्वजनिक बांधकामविभागाचे लक्ष वधले आहे. सदर रस्त्याची तातडीने डागडूजी करावीकिंवा संपूर्ण रस्ता नव्याने डाबरीकरण करावा अशी मागणी त्यांनीकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णयन झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणारा असल्याचा इशाराही त्यांनीदिला आहे. यावेळी शब्बीर मणियार, कौस्तुभ गावडे, सागर धोत्रे,साहिल खोबरेकर, राहुल माने आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # konkan update # news update
Next Article