Sangli Crime : गळवेवाडीत हाणामारी, आठजणांवर गुन्हा
आटपाडीत शेतकऱ्यांमध्ये संघर्ष
आटपाडी : शेतजमिन नांगरणीच्या कारणावरून झालेल्या वादंगातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोघे जखमी झाले. परस्परविरोधी फिर्यादीने दोन्ही बाजुच्या आठ जणांवर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय रामचंद्र गळवे याच्या फिर्यादीवरून राहुल सिध्देश्वर गळवे, प्रकाश साहुबा गळवे, साहुबा लक्ष्मण गळवे यांच्यावर तर प्रकाश साहुबा गळवे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र ज्ञानोबा गळवे, रोहित रामचंद्र गळवे, अक्षय रामचंद्र गळवे आणि पारूबाई रामचंद्र गळवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अक्षय गळवे यांच्या शेतातजाऊन ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असताना आमच्या शेतात नांगरणी का करत आहे, अशी विचारणा केल्याने शिवीगाळ करून दगडाने मारहाण करण्यात आली.
प्रकाश गळवे यांच्या शेतात चुलत भाऊ काशिनाथ गळवे हे ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना तेथे येवुन चौघांनी तु चुलत्याकडुन जमिन विकत घेवुन गट नं. ७१ मध्ये दावा सांगत आहेस असे म्हणुन भांडण काढले. प्रकाश, त्यांचे वडील आणि पत्नी यांना मारहाण करण्यात आली. तर वडील साहुबा यांना दगड मारून, भांडण सोडविण्यास आलेल्या काशिनाथ यांनाही करून मारहाण शिवीगाळ झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.