For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Weather : सांगली जिल्ह्यात थंडीचा कहर

02:15 PM Dec 12, 2025 IST | NEETA POTDAR
sangli weather   सांगली जिल्ह्यात थंडीचा कहर
Advertisement

                          सांगली जिल्ह्यात थंडीचा प्रचंड प्रभाव ; पारा ९ अंशांपर्यंत खाली

Advertisement

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात सध्या थंडीचा प्रभाव जाणवत असून, सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत किमान तापमान १२ ते ०९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे ते डिसेंबर महिनाअखेर दहा अंशापर्यंत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अनुसार ७ पासून सुरू झालेला चंडीचा वेढा १४ डिसेंबर या कालावधीत कायम राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शहरी भागात सकाळी दाट धुके आणि वाऱ्यामुळे वातावरण थंड गार झाले असून, नागरिकांना आरोग्यविषयक आव्हाने भेडसावत आहेत. गुरुवारी रात्री पारा नऊ अंशापर्यंत खाली उतरला..

बुधवारी तो १२.४ होता. गेल्या महिनाभरातील तापमानाचा आढावा घेतला तर, नोव्हेंबरमध्ये सांगलीत सरासरी कमाल तापमान ३०-३१ अंशांपर्यंत होते, तर किमान १५-२० अंशांपर्यंत होते. मात्र, डिसेंबरच्या सुरुवातीपासून अचानक ४-५ अंशांची घसरण झाली. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ३१ अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान आता १४ अंशांपर्यंत खाली आले आहे. हा अचानक बदल वातावरणीय दाब प्रणालीमुळे राजस्थानवर निर्माण झालेल्या प्रबळ उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांमुळे झाला आहे. हे वारे दक्षिणेकडे सरकून महाराष्ट्रात थंड हवाआणत आहेत, ज्यामुळे सामान्यपेक्षा ३-४ अंश कमी तापमान नोंदवले जाईल अशी शक्यता होती प्रत्यक्षात त्याहून पारा खाली चालला आहे.

Advertisement

आयएमडीच्या अंदाजानुसार, ही थंडी १२-१४ डिसेंबरपर्यंत कायम राहील, त्यानंतर हळूहळू वाढ होईल. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत सामान्यपेक्षा कमी तापमानाचीच शक्यता आहे. १० डिसेंबरच्या ताज्या अहवालानुसार आयएमडीने यलो अलर्ट जारी करून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. हवामान बदलामुळे अशा घटना वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

वाढता थोका आणि काळजीची गरज
थंडीमुळे श्वसनविकार, हायपोथर्मिया आणि हृदयविकाराचा घोका वाढतो. विशेषतः शेतकयांना ऊस, द्राक्ष बागांवर फ्रॉस्टचा धोका; शहरी भागात वाहतुकीत अडथळे येऊ शकतात. शहरी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, मुले व महिलांसाठी उपायः घरात राहा, बहुस्तरीय उबदार कपडे घाला, गरम पेये प्या, खिडक्या-दारे बंद ठेवा. ज्येष्ठांसाठी नियमित तपासणी, मुलांसाठी आउटडोअर खेळ टाळा, आदी उपाय योजण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.