कार्तिक स्वामींच्या चरणी पंधरा हजार भाविक नतमस्तक
कोल्हापूर :
जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिराच्या वतीने शुक्रवारी रात्री 9 वाजून 55 मिनिट ते शनिवार पहाटे 3 या कृतिका नक्षत्राच्या कालावधीत कार्तिक स्वामी जयंती सोहळा साजरा करण्यात आला. नक्षत्राचा कालावधी केवळ पाच तासांचाच शहर व परिसरातील पंधरा हजारावर भाविक आले होते. त्यांनी आपल्या सोबतचे मोरपिस, हार, केळी व श्रीफळ कार्तिक स्वामींना अर्पण कऊन मनोकामना व्यक्त केला. रात्री दहा वाजता सुऊ झालेली स्वामी दर्शन दर्शन रांग शनिवार 16 रोजीच्या पहाटेपर्यंत कायम होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी कृतिका नक्षत्राला सुऊवात झाली होती. तत्पूर्वी कार्तिक स्वामी मंदिराचे पुजारी साईराज कदम यांनी मंदिरातील कार्तिक स्वामींसह परिवारातील शंकर-पार्वती व गणपती यांच्या मूर्तीला अभिषेक केला. त्यानंतर या सर्वांचीच महापूजा बांधली. यानंतर 9 वाजून 55 मिनिटांची म्हणजेच कृतिका नक्षत्र सुऊ झाल्याची वेळ पकडून भाविकांसमोर कार्तिक स्वामी जयंती सोहळा सुऊ झाल्याचे पुजारी कदम यांनी जाहीर केले. तसेच भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यासही सुऊवात केली. शनिवार 16 रोजी दिवसभर मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.