महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायल-हिजबुल्ला यांच्यात भीषण युद्ध

06:30 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलच्या 100 विमानांकडून हल्ला, हिजबुल्लाकडून अग्निबाणांचा मारा, दोन दिवसांची आणीबाणी घोषित

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरुसलेम

Advertisement

इस्रायल आणि लेबेनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात भीषण युद्धाला तोंड फुटले आहे. इस्रायलले हिजबुल्लाच्या निवडक स्थानांवर वायुहल्ले चढविले असून अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. तर प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लाने इस्रायलवर अग्निबाणांचा जोरदार मारा केला आहे. तथापि, हिजबुल्लाची बहुतेक अग्निबाण इस्रायलच्या आयर्न डोम व्यवस्थेने अडविल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी विस्फोटकांनी भरलेल्या ड्रोन्सचाही उपयोग केला. या हल्ल्यामुळे इस्रायलने दोन दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे. हिजबुल्लाचा नायनाट केल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, अशा अर्थाचे विधान इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी केले आहे.

हनियाच्या हत्येनंतर...

हमास या संघटनेचा राजकीय प्रमुख ईस्माईल हानिया याची हत्या इराणमध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. ही हत्या इस्रायलने केली असा इराणचा आरोप आहे. इस्रायलला धडा शिकविला जाईल, अशी धमकीही इराणने दिली होती. मात्र, इस्रायलवर थेट हल्ला केल्यास आपली मोठी हानी होईल, या चिंतेपोटी इराणने आपल्या हिजबुल्ला या संघटनेकडून इस्रायलवर हल्ले चालविले आहेत.

100 विमानांचा हल्ला

रविवारी इस्रायलच्या 100 युद्ध विमानांनी लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाचे शस्त्रसाठे आणि अग्नीबाण प्रक्षेपकांवर अचूक हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचे अनेक सैनिक आणि नेते ठार किंवा गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. हल्ले अचूक असल्याने हिजबुल्लाची मोठी हानी झाल्याचे इस्रायलने स्पष्ट केले. त्यानतंर हिजबुल्लाने 320 अग्निबाण इस्रायलच्या सेनातळाच्या दिशेने सोडले. अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम तंत्रज्ञान शोधून काढले असून हमास आणि हिजबुल्ला यांचे अग्नीबाण निष्प्रभ ठरत आहेत.

हिजबुल्लाकडे मोठा शस्त्रसाठा?

आपल्यकाडे अग्नीबाण, क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक असा मोठा शस्त्रसाठा अद्यापही आहे, असा दावा हिजबुल्लाच्या प्रवक्त्याने केला. इस्रायलला रोखता येणार नाही, असा हल्ला करण्याचा विचार असल्याचेही विधान या संघटनेने केले. हजारोंच्या संख्येने डागता येतील इतके अग्नीबाण आहेत, अशी दर्पोक्ती या संघटनेच्या वतीने करण्यात आली. इस्रायलने त्याचीही सज्जता असल्याची घोषणा लगोलग केली.

इस्रायलच्या हल्ल्यात मोठी हानी

इस्रायलने हिजबुल्लावर केलेल्या वायूहल्ल्यात या संघटनेची मोठी हानी केल्याचे इस्रयलचे म्हणणे आहे. या संघटनेची अनेक शस्त्रागारे नष्ट केल्याचेही प्रतिपादन करण्यात आले. इराण किंवा हिजबुल्लाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत हिजबुल्लाला डोके वर काढू न देण्याचा निर्धार इस्रायलने केला असून येता दोन दिवांमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील.

इस्रायलचा इशारा

हिजबुल्ला दहशतवाद्यांचा ज्या स्थानी अधिक वावर आहे, तेथून अन्य नागरीकांनी बाहेर पडावे, असा इशारा इस्रायलने रविवारी दिला. संघर्ष अधिक वाढू नये म्हणून अमेरिका आणि युरोपियन देश प्रयत्नशील आहेत. तथापि, अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नसून यासाठी इराणचा हट्टाग्रह उत्तरदायी आहे. इस्रयल आणि अमेरिका यांनी घोषित पेलेली शस्त्रसंधी इराणच्या अध्यक्षांनी सरळ धुडकावली असून त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आखातातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय स्थितीच्या अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

Advertisement
Next Article