महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मथुरेत फटाका मार्केटला भीषण आग

06:48 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

26 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी : 12 जण होरपळले, 9 जण गंभीर

Advertisement

वृत्तसंस्था/ मथुरा

Advertisement

उत्तर प्रदेशातील मथुरा जिह्यातील राय कसबा येथील तात्पुरत्या फटाका मार्केटमध्ये दिवाळीच्या दिवशी दुपारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 हून अधिक जण होरपळले असून सर्वांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

राजा कसबा येथील माऊंट रोडवर असलेल्या गोपाळ बागेत फटाक्यांची  तात्पुरती दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती. दिवाळीनिमित्त फटाके खरेदीसाठी सकाळपासूनच येथे लोकांची गर्दी होती. याचदरम्यान आगीची दुर्घटना घडून जवळपास सर्व 26 दुकाने आणि काही दुचाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगीत लक्षावधी रुपयांचे फटाके व इतर साहित्य खाक झाले आहे.

आग लागल्याचे समजताच बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. लोक इकडे तिकडे धावू लागले. 12 हून अधिक जण होरपळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगीच्या कारणाचा शोध सुरू आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. आगीत होरपळलेल्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रूग्णालयात सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींपैकी चार जणांना आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे. उर्वरित जळालेल्या लोकांवर मथुरेमध्येच उपचार सुरू आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article