महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेतकरी-पोलिसांमध्ये हरियाणात तीव्र संघर्ष; काळ्या दिनामुळे पंजाबमध्ये शुकशुकाट

06:37 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आंदोलनस्थळी जाताना रोखल्यामुळे तोडफोड-लाठीमार : 

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगढ

Advertisement

शेतकरी आंदोलनादरम्यान शुक्रवारी ‘काळ्या दिना’चा परिणाम पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आला. हरियाणातील हिस्सारमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. खनौरीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखल्यानंतर दगडफेक झाल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सुरक्षा जवानांनी अटकाव केल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी दगडफेक केली. या चकमकीत 24 पोलीस आणि 16 शेतकरी जखमी झाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा शुक्रवारी बारावा दिवस होता. दिल्लीकडे मोर्चा वळवण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. पुन्हा शेतकरी आपल्या मागण्यांसह आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शुक्रवारी देशभरात ‘काळा दिवस’ साजरा केला. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी नेत्यांचे पुतळे जाळून तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, पंजाब सरकारने मृत शेतकरी शुभकरन सिंह याच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच सरकारने मृताच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही केली. शुक्रवारी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर आणखी एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आंदोलनात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणात शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. शेतकऱ्यांना खनौरी सीमेवर पंजाबच्या शेतकऱ्यांकडे जायचे होते, मात्र पोलिसांनी त्यांना हिसारमधील खेडी चौपाटा येथे अडवले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज केला. या चकमकीत 40 हून अधिक जण् जखमी झाल्याचे वृत्त आहे. यादरम्यान हरियाणा पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी काही शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले आहे. हरियाणातील हजारो शेतकरी शुक्रवारी खेडी चौपाटा सीमेवर जमले होते. शेतकरी संघटना आणि खाफ पंचायतीने शेतकऱ्यांना आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी खनौरी हद्दीत बोलावले होते.

शुभकरनच्या कुटुंबाला एक कोटी, बहिणीला सरकारी नोकरी...

खनौरी सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या शुभकरन सिंह यांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकार एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार असून त्यांच्या लहान बहिणीला सरकारी नोकरी दिली जाणार आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी हमीही पंजाब सरकारने दिली आहे. खनौरी सीमेवर दर्शन सिंग नामक आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत शेतकरी नेते पंढेर यांनी 62 वषीय दर्शनसिंग यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी केली.

रासुका चालणार नाही!

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हरियाणा पोलीस राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी आपला निर्णय बदलल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबाला पोलिसांनी शंभू सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून शेतकरी आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या आहेत. हरियाणात 30 पोलीस जखमी झाले असून दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सरकारी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article