कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘फिडे’ ग्रँड स्विस : एरिगेसी, गुकेशला अव्वल दोन मानांकने

06:20 AM Jul 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय स्टार अर्जुन एरिगेसी आणि विश्वविजेता डी. गुकेश यांना 3 ते 16 सप्टेंबरदरम्यान समरकंद, उझबेकिस्तान येथे होणाऱ्या चौथ्या फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल दोन मानांकने देण्यात आली आहेत. या स्पर्धेतील बक्षीस रक्कम वाढविण्यात आली आहे आणि प्रतिष्ठित कँडिडेट्स स्पर्धेचे तिकीटही त्यातून प्राप्त होऊ शकणार आहे.

Advertisement

नियमांनुसार, खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटांतील अव्वल दोन खेळाडू 2026 च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील, ज्यातून जागतिक विजेत्याच्या किताबास आव्हान देणारा खेळाडू निश्चित केला जाईल. या स्पर्धेकरिता जुलै, 2024 ते जून, 2025 दरम्यान खेळाडूंनी 30 पेक्षा जास्त क्लासिकल रेटेड गेम्समध्ये भाग घेतला पाहिजे या नियमामुळे माजी विश्वविजेते मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यासारख्या हाय प्रोफाइल नावांना वगळण्यात आले आहे. माजी विश्वविजेता डिंग लिरेन देखील या स्पर्धेत सहभागी होणार नाही.

मागील तिन्ही ग्रँड स्विस स्पर्धांमध्ये खेळलेला फॅबियानो काऊआना देखील भाग घेणार नाही, कारण त्याने 2024 ची फिडे सर्किट जिंकून 2026 च्या पॅंडिडेट्स स्पर्धेत आधीच स्थान मिळवले आहे. एरिगेसी आणि गुकेश यांना अनुक्रमे पहिले व दुसरे मानांकन लाभले आहे, तर आर. प्रज्ञानंदला नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हच्या मागे चौथे मानांकन मिळाले आहे. 22 वर्षीय आणि जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकांवर असलेल्या अलिरेझा फिरोजाला पाचवे मानांकन लाभले आहे.

खुल्या विभागातील उर्वरित आघाडीच्या 10 खेळाडूंत दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियनशिप आव्हानवीर लॅन नेपोम्नियाच्ची, अनीश गिरी, शाखरियार मामेदयारोव्ह, लेव्हॉन आरोनियन आणि व्लादिमीर फेडोसेव्ह असे अधिक अनुभवी ग्रँडमास्टर्स आहे. ग्रँड स्विस ही सर्वांत महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक आहे, कारण त्यातून कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र होता येते. 2023 ची ग्रँड स्विस भारताच्या विदित गुजराती (खुला गट) आणि आर. वैशाली (महिला) यांनी जिंकली होती. या 11 फेऱ्यांच्या स्विस फॉरमॅट स्पर्धेत 172 खेळाडू सहभागी होतील, 116 खुल्या गटात आणि 56 महिला गटात.

महिला ग्रँड स्विसमध्ये 44 खेळाडूंनी रेटिंगद्वारे पात्रता मिळवली आहे. त्यांच्यासोबत खंडीय स्थानांतून चार अतिरिक्त खेळाडू, चार फिडे वाइल्ड कार्डद्वारे आणि आणखी चार खेळाडू स्थानिक आयोजकांची नामांकने म्हणून सहभागी होतील. माजी वर्ल्ड चॅम्पियन तान झोंगयी ही टॉप-रेटेड खेळाडू आहे, त्यानंतर अनुभवी कोनेरू हम्पी, अॅना मुझीचुक आणि कॅटेरिना लॅग्नो यांचा क्रमांक लागलेला आहे. 2023 ची विजेती आर. वैशाली देखील भाग घेणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article