For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत्यूचा सण! पैसे देऊन शवपेटीत झोपतात लोक

06:37 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृत्यूचा सण  पैसे देऊन शवपेटीत झोपतात लोक
Advertisement

स्वत:चाच अंत्यसंस्कार पाहण्याची हौस

Advertisement

जगभरात लोक अनेक प्रकारचे सण साजरे करतात, यात होळी, टोमाटिना, हैलोवीन यांचा समावेश आहे. यात काही ठिकाणी परस्परांवर टोमॅटो मारण्याचा तर काहींमध्ये आतिषबाजीची परंपरा आहे. परंतु जपानमधील एक अनोखा महोत्सव चर्चेत आहे. डेथ फेस्टिव्हल म्हणजेच मृत्यूचा हा सण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

2023 मध्ये जपानमध्ये सुमारे 1.6 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. अशा स्थितीत देशाच्या प्रसारमाध्यमांनी याला ‘इरा ऑफ हाय मोर्टेलिटी’ ठरविले. परंतु अलिकडेच टोकियोच्या शिबुया जिल्ह्यात साजरा करण्यात आलेल्या 6 दिवसीय डेथ फेस्टिव्हलला पाहिल्यास मृत्यू इतकी भयानक गोष्ट नसल्याचे वाटते. यात लोक मृतदेहाप्रमाणे शवपेटीत झोपून व्हर्च्युअल रिअॅलिटी ग्लासेसच्या मदतीने मृत्यूनंतर होणारे स्वत:चे अंत्यसंस्कार अनुभवू शकतात. याचबरोबर मृत्यूनंतरच्या जगाला एक्सप्लोर करण्याचीही लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे.

Advertisement

मृत्यूनंतरचे जग

एनजीओ, नवी माध्यमं कंपन्या आणि फ्यूनरल प्रोफेशनल्स समवेत टोकियो येथील संस्थांच्या एका महासंघाकडून शिबुयामध्ये डेथ फेस्टिव्हल आयोजित करण्यात येतो. 6 दिवसांच्या या फेस्टमध्ये लोकांना व्हर्च्युअल रिअॅलिटी टेक्निकचा वापर करून मृत्यूपश्चातच्या जगाची जाणीव करून घेण्याची संधी मिळते. येथे खाणे देखील मृत्यूवरून प्रेरित असते.

मृत्यूचे सत्य

या फेस्टिव्हलचे लक्ष्य लोकांचा विचार बदलणे, मृत्यूचा सामना करणे आणि त्यांना जीवनासोबत जोडण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. याच्या मूळाशी मृत्यूची थीम, प्रेम, ग्रेटीट्यूड आणि नाती यासारख्या जीवनांच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आल्याचे एका बुकलेटमध्ये म्हटले गेले आडहे.

जीवन कसे जगावे?

जपान अधिक मृत्यूदर, कमी प्रजनन दर आणि वृद्ध लोकसंख्या असलेला देश आहे. अशा स्थितीत याच्या माध्यमातून आम्ही लोकांना मृत्यूची जाणीव करवितो, जेणेकरून वेळेत जीवन कसे जगावे हे समजावत असतो असे फेस्टच्या संस्थापकांचे सांगणे आहे. चीनमधील शेनयांग शहरात देखील अनेक सेंटर्स हा मृत्यूचा अनुभव प्रदान करत असतात.

Advertisement
Tags :

.