महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फीमेल लव्हगुरु 163 कोटी कमाई

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

श्रीमंत व्यक्तीशी कसा करावा विवाह

Advertisement

एक वादग्रस्त लव्हगुरु महिलांना श्रीमंत पुरुषांशी कसा विवाह करावा हे शिकविते. हे काम करण्यासाठी ही फीमेल लव्हगुरु वर्षाकाठी 163 कोटी रुपये कमावत आहे. या इन्फ्लुएंसरचे नाव ले चुआनकू असून तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे रिलेशनशिप आणि वित्तीय सल्ला प्रदान करण्यासाठी चीनमध्ये ‘लव्ह गुरु’च्या स्वरुपात लोकप्रियता मिळविली आहे. तिचे मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. परंतु चुआनकूच्या सल्ल्यामुळे अनेकदा वादही उभे ठाकले आहेत.

Advertisement

तिचा सल्ला अनेकदा वाद निर्माण करतो, कारण नातेसंबंधात अनैतिक मानले गेलेल्या वर्तनाला ती प्रोत्साहन देते. विवाह आणि नात्यांना पैसे प्राप्त करण्याचे साधन म्हणून पाहते आणि अन्य महिलांना देखील असेच करणे शिकविते. सर्व नातेसंबंध मूळ स्वरुपात लाभाच्या देवाणघेवाणीवर आधारित आहेत, प्रत्येक गोष्टीचा वापर स्वत:ला सशक्त करण्यासाठी केला जावा, असे तिचे सांगणे आहे.

चुआनकू लाइव्ह-स्ट्रीम दरम्यान एक सल्ला देण्याच्या बदल्यात 12,945 रुपये आकारते. तिचा सर्वाधिक पसंत केला जाणारा कोर्स ‘मूल्यवान नाते’चे शुल्क 43,179 रुपये इतके आहे. याचबरोबर ही फीमेल लव्हगुऊ वैयक्तिक स्तरावर सल्ला देण्यासाठी दर महिन्याला 1,16,927 रुपयांचे शुल्क घेते. सोशल मीडियावर ती अनेक वर्कशॉप आणि सेमिनारचे आयोजन करते, तेथे ती डेटिंग स्ट्रॅटेजीवर लोकांना मार्गदर्शन करते. वादात सापडत असल्याने तिला स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर बॅन करण्यात आले आहे. परंतु तरीही ती स्वत:च्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी एआय तंत्रज्ञान, थेट ग्राहकाशी चर्चा करणे आणि वैयक्तिक साधनांचा वापर करते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article