कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूमी अभिलेख कार्यालयातून महिला कर्मचाऱ्याची बॅग चोरीस

06:08 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे भीतीचे वातावरण : चोरट्याची छबी सीसीटीव्हीत कैद

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील भूमी अभिलेख कार्यालयातून एका महिला कर्मचाऱ्याची बॅग चोरट्यांनी दिवसाढवळ्या हातोहात पळवली आहे. सोमवार दि. 5 मे रोजी ही घटना घडली असून चोरट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बंद घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता सरकारी कार्यालयेदेखील लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूमी अभिलेख उपसंचालकांच्या कार्यालयात जमिनीसंबंधी कामासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे दररोज कार्यालयात गर्दी असते. रविवारी कार्यालय बंद असल्याने सोमवारी कार्यालयात गर्दी होती. अधिकारी व कर्मचारीदेखील आपापल्या कामात व्यग्र होते. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने आपली बॅग टेबलवर ठेवली होती. मात्र, कार्यालयात शिरलेल्या एका चोरट्याने हातचलाखी करत टेबलवरील बॅग पळविली आहे.

सदर बॅगेत 2 ग्रॅम वजनाचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. त्याचबरोबर पॅनकार्ड, आधारकार्ड व इतर कागदपत्रे बॅगेत होती. ठेवलेल्या ठिकाणची बॅग गायब झाल्याने कार्यालयात शोधाशोध सुरू करण्यात आली. त्यावेळी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता कार्यालयात शिरलेल्या एका चोरट्याने बॅग पळविल्याचे दिसून आले. चोरीच्या या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

कागदपत्रे टाकली पोस्टबॉक्समध्ये

चोरट्याने कार्यालयातून बॅग घेऊन बाहेर पडल्यानंतर बॅगेतील दागिने आणि पैसे पळविले आहेत. मात्र, बॅगेतील पॅनकार्ड, आधारकार्ड व इतर कागदपत्रे उपनोंदणी कार्यालयाच्या समोर असलेल्या पोस्ट बॉक्समध्ये टाकून पलायन केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article