महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी महिला कलाकारांनी संपर्क साधावा

10:25 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदार मेधा कुलकर्णी यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : निवेदिता प्रतिष्ठानचे 25 वे वर्ष आहे आणि प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील महिलांना घेऊन काम करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध कलाक्षेत्रातील महिला एकाच व्यासपीठावर आणणं आणि एवढ्या महिलांना इतकी वर्षे एकत्रित ठेवणं हा अनुराधाताईंचा उपक्रम खूप छान आहे. अशा कलाकारांच्या पाठीशी मी नेहमीच असते. मी राजकारणात असले तरीही मी स्वत: एक रसिक आहे. कलाकारांची दाद मी नेहमीच देत असते आणि यापुढे कोणत्याही कलाकार महिलांना कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्या माझ्याशी संपर्क करू शकतात. मी कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार आहे, असे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. निवेदिता प्रतिष्ठानतर्फे आयोजित पाच दिवसांच्या ललना कला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील (अकलूज) आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नर्तक पं. डॉ. नंदकिशोर कपोते उपस्थित होते. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर, वर्ल्ड क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मिळवणाऱ्या नीता मेहता आणि इंटरनॅशनल पॉवरलिफ्टर ज्योती भाडेकर आणि रजनी अंतापूरकर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन, पद्मावती येथे झाला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निवेदिता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा भारती यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

Advertisement

त्या म्हणाल्या, निवेदिता प्रतिष्ठानचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून ललना कला महोत्सवाचे 11 वे वर्ष आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, नृत्यकला, क्रीडा या क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देणारे हे व्यासपीठ आहे. याप्रसंगी ‘ललना कलारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ‘स्टार प्रवाह’फेम बालगायिका श्रुती भांडे (वय 9, अकोला), भरतनाट्याम् नृत्यांगना मिताली नाईक (गोवा), कथ्थक नृत्यांगना डॉ. नीलिमा हिरवे (पुणे), ‘इन लाईन फ्री स्टाईल स्केटिंग’मध्ये आशियाई चॅम्पियशिप पटकाविणाऱ्या श्रेयसी जोशी (वय 15, पुणे) व स्वराली जोशी (वय 17, पुणे) आणि प्रख्यात चित्रकार रुही अन्वर कुरेशी यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उद्योजिका डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यामध्ये नृत्य, काव्य व चित्रकला या माध्यमातून सादर होणारा ‘पंचतत्त्व आणि स्त्राr’ कार्यक्रम ‘आकृती’ ग्रुपतर्फे सादर झाला. नाट्याछटा व कथा या माध्यमातून भारतातील शूर व धाडसी महिलांवर आधारित ‘ऐतिहासिक वीरांगना’ कार्यक्रम ‘कथासाखी’ ग्रुपतर्फे सादर झाला. भरतनाट्याम् नृत्याद्वारे ‘महिषासुरमर्दिनी व भैरवी शतकम्’ हा कार्यक्रम राम वाळिंबे व मुक्ताताई भागवत यांनी सादर केला. कथ्थक नृत्याद्वारे ‘नवदुर्गा’ हा कार्यक्रम ‘कलापद्म अकॅडमीच्या’ कलावंतांनी सादर केला आणि ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाल्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित गाण्यांवर आधारित ‘रंगीला रे’ हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम ‘निवेदिता प्रतिष्ठान’ व ‘नृत्यांजली कथ्थक ग्रुप’ यांनी सादर झाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article