महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नूतन रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार

10:47 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : येथील विविध न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या इतरत्र बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व न्यायाधीशांच्या सत्काराचा कार्यक्रम बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील वकील समुदाय भवनमध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर होते. पहिले अतिरिक्त मुख्य दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी संजय गुडगुंदी, मुख्य उच्च दिवाणी न्यायाधीश शर्मिला एस., चौथे अतिरिक्त उच्च दिवाणी न्यायाधीशपदी शर्मिला कामत, मुख्य दिवाणी न्यायाधीश प्रिती मालावळ्ळी, पहिले अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशपदी गुरुप्रसाद सी., आठवे जेएमएफसी न्यायाधीशपदी गौरम्मा,लोकअदालत चेअरमनपदी रविंद्र पल्लेद यांची वर्णी लागली आहे. या सर्वांचा सत्कार करण्यात आला. मुख्य न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी यांनी सर्व न्यायाधीशांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी येथील वकील सर्व ते सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर असतात.त्यामुळे सर्वांनी योग्यरितीने सहकार्य करत कामकाज पाहावे आणि अधिकाधिक खटले निकालात काढावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नूतन न्यायाधीशांनीही निश्चितच आम्ही प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून आम्हाला वकिलांनीही सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. बेळगाव बार असोसिएशनचे जनरल सेव्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे यांनी प्रारंभी नूतन न्यायाधीशांचे प्रास्ताविक व स्वागत केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी वकिलांकडून सर्व ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी विविध न्यायालयांचे न्यायाधीश तसेच वकील उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article