फेडएक्स कॉर्पचे आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत 80 अब्ज डॉलरचे योगदान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फेडएक्स कॉर्पने 2023 या आर्थिक वर्षात कंपनीच्या जगभरातील नेटवर्कचे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम वाढवण्याच्या भूमिकेचे विश्लेषण करून डन अँड ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून वार्षिक अहवाल सादर केला आहे.
“फेडएक्सने ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा लक्षात घेत व्यवसायांच्या वस्तू, सेवा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करून पाच दशकांमध्ये जागतिक पुरवठा साखळी आणि ई-कॉम`र्स क्रांती घडवून आणण्यास मदत केली आहे,” असे फेडएक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम म्हणाले.
अहवालात असे दिसून आले आहे की, जगभरात आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही फेडएक्सने आर्थिक वर्ष 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारे 80 अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान दिले. यातून हेच दिसून येते की फेडएक्सने उत्तम नेटवर्क तयार केले आहे आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत जलद गतीने सेवा पोहोचवता येत आहेत. या अहवालात भारतावर झालेल्या परिणामांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात कंपनीने 2900 पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे आणि कंपनी तीन आंतरराष्ट्रीय गेटवे चालवते.