For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेडररचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश

06:02 AM Nov 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
फेडररचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश
Advertisement

वृत्तसंस्था / पॅरिस

Advertisement

स्वीसचा जागतिक दर्जाचा पुरूष टेनिसपटू रॉजर फेडररचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने घेतला आहे. सदर घोषणा या फेडरेशनच्या प्रवक्त्याने केली आहे.

न्यूपोर्ट ऱ्होडे आयलंड येथे 2026 च्या ऑगस्टमध्ये आयोजिलेल्या समारंभात रॉजर फेडररच्या तैल चित्राचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जाणार आहे. जागतिक टेनिस क्षेत्रात रॉजर फेडररचे योगदान महत्त्वाचे समजले जाते. 2022 साली तो जागतिक टेनिस क्षेत्रातून निवृत्त झाला. त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला होता. तसेच त्याने 2004 आणि 2008 साली एटीपीच्या मानांकनात विक्रमी 237 आठवडे अग्रस्थान राखण्याचा विक्रमही रॉजर फेडरेशनच्या नावावर नोंदविला गेला आहे. एटीपीच्या मानांकनात त्याने आपल्या टेनिस कारकिर्दीत 310 आठवडे अग्रस्थान राखले आहे. फेडररच्या कालावधीत नदाल, जोकोविच हे त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. 44वर्षीय  रॉजर फेडरर टेनिस क्षेत्रातील एक परिपूर्ण सभ्य असे व्यक्तीमहत्व म्हणून ओळखले जाते.

Advertisement

Advertisement
Tags :

.