महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त आज

01:16 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्यासह देशविदेशांतून भाविक दाखल : बडोद्याचे बिशप माश्कारेन्हस प्रमुख मार्गदर्शक

Advertisement

पणजी : जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त आज सोमवारी 4 रोजी साजरे केले जाईल. त्यासाठी भाविकांनी जुने गोवेत गर्दी केली आहे. दर वर्षी हे फेस्त 3 डिसेंबरला साजरे व्हायचे, यंदा यादिवशी रविवार आला असून रविवारी फेस्त साजरे केले जात नाही, म्हणून आज सोमवारी 4 डिसेंबरला फेस्तचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता मुख्य प्रार्थनेच्यावेळी प्रमुख उत्सवमूर्ती म्हणून बडोद्याचे बिशप फादर सेबेस्त्याँव माश्कारेन्हस हे उपस्थित राहणार असून  ते आपल्या संबोधनातून भाविकांना शांती, सलोख्याचा संदेश देतील. गोवा, दमण व दिवचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव हेही उपस्थित राहतील. पहाटे 4 वाजल्यापासून प्रार्थना सुऊ होतील. सकाळी 9 वाजेपर्यंत तासातासाने प्रार्थनासभा होतील. सकाळी 10.30 मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, आमदार व इतर महनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या फेस्तानिमित्त गेल्या 25 नोव्हेंबरपासून ‘नोव्हेना’ प्रार्थनासभा सुऊ आहेत. ‘नोव्हेना’ नऊ दिवस चालतात.

Advertisement

देशविदेशांतून येतात भाविक

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशातील इतर भागातून लाखो भाविकांची उपस्थिती या काळात असते. गोव्याच्या विविध भागांपासून देशविदेशांतून भाविक या फेस्तासाठी येतात. बेळगाव, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आजरा, गडहिंलज, व अन्य भागातून  ख्रिस्ती भाविक चालत गोव्यात येतात. त्यांच्यासाठी मराठी, कन्नड तसेच विदेशी भाविकांसाठी स्पॅनिश व फ्रेंच भाषेतूनही प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 नंतरही सायंकाळपर्यंत तासातासाने प्रार्थनांचे आयोजन आहे. चर्चच्या आवारात भव्य व्यासपीठ तयार केले आहे. एलईडी आणि भव्य क्रीन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

कडक पोलीस बंदोबस्त

फेस्तानिमित्त जुने गोवे भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फेस्तानिमित्त भरणाऱ्या फेरीसाठी जुने गोवेंत मेणबत्त्या तसेच मेणाचे अवयव विकणारे व्यावसायिक, चणें, खाजें विक्रेते,  पारंपरिक मिठाई तसेच फर्निचर, तयार कपडे, खेळणी, पादत्राणे आदी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. नवस फेडण्यासाठी मेणापासून तयार केलेले मानवी अवयव, मेणबत्त्यांची दुकाने थाटली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article