महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोबोटमुळे खासगीत्व धोक्यात येण्याची भीती

06:38 AM Feb 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2030 पर्यंत रोबोट करणार घरातील 40 टक्के काम

Advertisement

तंत्रज्ञानाने जगाला वेगाने बदलले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) हा बदल अधिकच वेगवान झाला आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत शॉपिंगमध्ये खर्च होणाऱया वेळेत 60 टक्क्यांपर्यंत घट होणार असल्याचे ब्रिटन आणि जपानच्या 65 एआय तज्ञांनी एका अहवालात नमूद केले आहे. एआयद्वारे दुकान-मॉलच्या सुरक्षेपासून बिलिंग, सफाईपासून स्टोरेजपर्यंत सर्व गोष्टी रोबोट्स करणार आहेत. घरातील बहुतांश कामे ऑटोमेशनवर होतील.

Advertisement

साफसफाई, भांडी घासणे, स्वयंपाक करण्यासारखी घरातील 40 टक्के कामं रोबोट करतील. परंतु मुले आणि वृद्धांच्या देखभालीत या चालू दशकाच्या अखेरपर्यंत एआयची फार मोठी मदत होण्याची अपेक्षा नसल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे.

स्मार्ट तंत्रज्ञानाच्या या काळात खासगीत्वावर सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकणार आहे. एलेक्सा सारखे ऑटोमेशन डिव्हाइस प्रत्येक बाब नोंदवून घेते. प्रत्येक कृत्यावर एकप्रकारचे सर्व्हिलान्स झाले आहे. एआय तंत्रज्ञान जसजसे स्मार्ट होत चालले आहे, आमची खासगीत्व धोक्यात येत आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत माणसांसाठी स्वतःचे खासगीत्व सांभाळणे अवघड ठरणार असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील एआय प्राध्यापिका एकटॅरिना हरटॉग यांनी म्हटले आहे.

हा एकप्रकारे खासगीत्वावरील हल्ला असून समाज यासाठी अजिबात तयार नाही. परंतु एआयमुळे समाजात महिला-पुरुषांमध्ये समानतेची पातळी वाढणार आहे. जपानमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला घरातील कामे पाचपट अधिक करतात. यामुळे त्यांच्याकडे फारसा रिकामा वेळ नसतो. परंतु एआयमुळे यात सुधारणा होणार असल्याचे हरटॉग म्हणाल्या.

तंत्रज्ञान स्वस्त होणार लागणार वेळ

सर्व जगात घरगुती कामांमुळे महिला पुरुषांइतकी प्रगती करू शकत नसल्याचा निष्कर्ष अन्य एका अहवालाने काढला आहे. स्मार्ट घरांमध्ये महिलांकडेही पुरुषांइतकाच मोकळा वेळ राहणार असल्याने समाजात समानता येणार आहे. एआय प्रभावी असले तरीही ते सर्वांसाठी सुलभ नसेल. एआय तंत्रज्ञान स्सवस्त होण्यास मोठा वेळ लागणार आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत हे तंत्रज्ञान काही समृद्ध लोकच वापरू शकतील. बहुतांश स्मार्ट तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यातील नसतील असे प्लस वन या नियतकालिकात प्रकाशित अहवालात म्हटले गेले आहे.

रोबोटकडून स्वयपांक

युरोपीय देश क्रोएशियाच्या जगरेब रेस्टॉरंटमध्ये रोबोट शेफ खाद्यपदार्थ करतो. रोबोटने तयार केलेले खाद्यपदार्थ चविष्ट असतात. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील अमेझॉनच्या सुपरमार्केटमध्ये एका शिफ्टमध्sय केवळ 6 कर्मचाऱयांची गरज भासते. तेथे बिलिंगपासून सामान ठेवण्यापर्यंतचे सर्व काम रोबोटद्वारे होते. रोबोटच सेल्फवर सामान ठेवण्याचे काम करतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article