जपानमध्ये वाढली निंजा अस्वलांची दहशत
जपानची निंजा युद्धकला जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु अनेकदा काही अनोख्या गोष्टींना निंजासोबत जोडले जाते. अशा स्थितीत जेव्हा आम्ही निंजा अस्वलाविषयी ऐकतो, तेव्हा आम्हाला जपानच्या एखाद्या खास प्रकारच्या अस्वलाची जाणीव होते. मागील अनेक महिन्यांपासून जपानमध्ये या निंजा अस्वलांची दहशत वाढत चालली आहे. हे अस्वल आता माणसांवरही हल्ले करू लागले आहेत, यामील कारण कमी विचित्र नाही.
मागील वर्षी एक विशाल ‘निंजा अस्वला’ला अखेर पकडण्यात आले होते, जो अनेक वर्षांपासून गुरांवर हल्ले करत होता. परंतु आता पुन्हा गुरांचा मृत्यू घडू लागला आहे. कधीकाळी माणसांपासून दूर राहणारे अस्वल आता माणसांवरच लक्ष केंद्रीत करत आहेत.
जपानचे पर्वतीय बेट होक्काइडोमध्ये एक विशाल अस्वल होता, ज्याची लांबी 7 फूट 3 इंच इतकी होती आणि स्थानिक लोक त्याला ओसो18 असे संबोधित करायचे. हे अस्वल शेतांमध्ये असलेल्या लोकांवर हल्ले करायचे आणि गुरांचा जीव घेत होते. अनेक वर्षांपर्यंत हे हल्ले होत राहिले आणि या अस्वलाला कुणीच पकडू शकले नव्हते, यामुळे याला निंजा अस्वल म्हटले जाऊ लागले. परंतु हा प्रकार आता वाढला आहे.
अस्वल हे प्रामुख्याने शाकाहारी आणि किटक आहारी आहे. परंतु जपानमध्ये हरणांच्या वाढत्या संख्येमुळे अस्वलांमध्ये त्यांच्या मांसासाठी स्वाद विकसित झाला आहे. हरणांची पूर्वी शिकार केली जात होती, परंतु आता शिकारी कमी आहेत. तसेच त्यांनी शिकार केल्यावर ते मृत शरीर पर्वतावरच सोडून देतात, यामुळे अस्वलांना सहजपणे खाद्य मिळते.
अस्वल आता निर्जन क्षेत्रांवर कब्जा करत आहेत. शिकार प्रथांमध्ये बदलाचा अस्वलांच्या संख्येवर अत्यंत मोठा प्रभाव पडला आहे. सर्वसाधारणपणे शिकारी अस्वलाच्या संख्येला नियंत्रित करतात, परंतु जपानमध्ये युवा पिढी शहरांमध्ये स्थलांतरित झाली आणि अनेक शिकारी आता वृद्ध झाले आहेत. अशा स्थितीत खाद्याच्या शोधात निर्भय अस्वलं आता शेतांमध्ये हल्ले करत असल्याचे कांडा युनिव्हर्सिटी ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील जपानी अध्ययनाचे विशेष व्याख्याते जेफरी जे हॉल यांनी सांगितले आहे.