For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गुस्ताख इश्क’मध्ये फातिमा

06:41 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गुस्ताख इश्क’मध्ये फातिमा
Advertisement

विजय वर्मासोबत जमणार जोडी

Advertisement

विजय वर्मा आणि फातिमा सना शेखचा आगामी चित्रपट ‘उल जलूल इश्क’चे नाव बदलण्यात आले आहे. फॅशन आयकॉन मनीष मल्होत्राकडून निर्मित या रोमँटिक ड्रामाचे नाव ‘गुस्ताख इश्क’ ठेवण्यात आले आहे. मनीष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. तसेच त्याने एक नवे पोस्टर जारी केले असून यात विजय आणि फातिमा परस्परांच्या मिठीत असल्याचे दिसून येते. पोस्टरमध्ये विजय आणि फातिमा यांच्यातील केमिस्ट्री दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय आणि फातिमा ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विभु पुरी करणार आहेत. त्यांनी यापूर्वी हवाईजादा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले हेते. तर नव्या चित्रपटाची देखील विभु पुरी यांनीच लिहिली आहे. तर या चित्रपटासाठी गुलजार आणि विशाल भारद्वाज हे एकत्र आले आहेत. गुलजार यांच्या गीताना विशाल भारद्वाज संगीत देणार आहेत. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह हे दिग्गज कलाकारही दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.