तासगावात बापाची हत्या, मुलगा ताब्यात
तासगाव :
आमच्यासाठी काय कमावून ठेवलंस, आम्हाला कायम दारिद्र्यातच ठेवले आहेस, असे म्हणत रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत त्याची हत्या केल्याची घटना तासगाव येथे घडली. यामध्ये सुधाकर तुकाराम कांबळे (वय ६५ रा. कांबळेवाडी, तासगाव) हे जागीच मयत झाले. याप्रकरणी मयताचा मुलगा सचिन कांबळे (वय ४५ रा. कांबळेवाडी, तासगाव) यास तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सुनीता अशोक कांबळे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत घटनास्थळावरून माहिती मिळालेली अशी, मृत सुधाकर कांबळे हे कांबळेवाडी येथे पत्नी व मुलगा सचिन याच्यासोबत राहत होते. त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. त्यामुळे मुलगा सचिन हा नेहमी वडिलांना दोष देत असे. रवि वारी २७ जुलै रोजी सचिन याने दिवसभर वडिल सुधाकर कांबळे यांना दोष देत तुम्ही आमच्यासाठी काय कमवून ठेवले आहे, असे म्हणत मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी गाल, कान, खुबे असे शरीरावर अनेक ठिकाणी ठोसे मारले. या मारहाणीत ते रात्री मृत्यू पावले.
मृत सुधाकर तुकाराम कांबळे त्यांची पत्नी सोमवारी सकाळी त्यांना उठविण्यासाठी गेली असता सुधाकर निपचित पडलेले दिसून आले. त्यांनी शेजारील लोकांना हाका मारून बोलावून घेतले. सकाळी सुधाकर कांबळे यांचे मेहुणे कुमार मल्लाप्पा मागडे यांनी स धाकर कांबळे यांचा गळा दाबून खून झाला असल्याची माहिती पोलीस मदत कक्षातील ११२ ला कॉल करून दिली होती.
या गुन्ह्याची माहिती मिळताच, तासग्-व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, घटनास्थळावर माहिती मिळाल्यानुसार सचिन कांबळे यास ताब्यात या गुन्ह्याची माहिती मिळताच, तासग्-व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, घटनास्थळावर माहिती मिळाल्यानुसार सचिन कांबळे यास ताब्यात घेत मृत सुधाकर कांबळे यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला होता. संशयित सचिन कांबळे याने लाथा व बुक्क्यांनी वडिलांना जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदनातून समोर आली. त्यानुसार संशयित सचिन सुधाकर कांबळे यास तासम्-गाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी विमला एस, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, पोलीस अ-मलदार, अभिजीत गायकवाड, सागर पाटील, प्रशांत चव्हाण, सतीश साठे आदिनी घटनार-थळी धाव घेतली.
- काळ्या पाण्याची शिक्षा द्या
आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने माझा पती धनसंपत्ती मिळवू शकला नाही. तरीही, निष्ठरपणे मारहाण करून 'माझ्या मुलाने बापाचा खून केला आहे'. त्याला काळ्यापाण्याची शिक्षा द्या' अशी विनवणी सुधाकर यांच्या पत्नीने केली.