For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळपईत गाय, वासरु चोरीप्रकरणी पिता-पुत्राला अटक

03:00 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाळपईत गाय  वासरु चोरीप्रकरणी पिता पुत्राला अटक
Advertisement

वाळपई : शनिवारी रात्री एका मोटरसायकलवरून दोघेजण गायीच्या वासराला घेऊन जात असून त्यांचा एक गाय पाठलाग करीत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. याची येथील पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पिता-पुत्राला अटक केली आहे. गायीची हत्या करण्यासाठी तिच्या वासराला घेऊन जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काहींनी सदर प्रकार हा चुकीच्या पद्धतीने समोर आणलेला आहे. वासराला घेऊन जाणारा व त्याच्यामागे धावणारी गाय आपल्या मालकीची आहे, असा सूर या पिता-पुत्राने लावला होता. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे याला पूर्णविराम मिळालेला आहे. वाळपई पोलिसांनी ही कारवाई केल्याबद्दल गोप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबतची माहिती अशी की, वाळपई सरकारी माध्यमिक विद्यालयाकडून मोटरसायकलवरून नाणूस येथील नूर मोहम्मद अन्सारी (40) व ओमान नूर अन्सारी (20) हे मोटरसायकलवऊन एका वासराला घेऊन जात आहेत तर त्यांच्या मागून गाय धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सत्तरी तालुक्मयासह गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. कत्तल करण्यासाठी गायीला घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त कऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली होती. शेवटी रात्री उशिरा पिता - पुत्राला अटक करण्यात आली.

Advertisement

पोलिसांकडून लपवाछपवीचा प्रकार कशाला?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून सदर गाय व वासरू ही त्यांच्याच मालकीचे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरा त्यांना अटक का करण्यात आली असा सवाल पत्रकारांनी केला आहे. यामुळे वाळपई पोलीस अशा प्रकरणात नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप नागरिकाकडून करण्यात आलेला आहे. गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब यांनी याबाबत खेद व्यक्त केला होता. सदर गाय व वासऊ त्या दोघांच्या मालकीची नाही, त्यांची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी. गोरक्षा संघटना गप्प बसणार नसल्याचा इशारा परब यांनी दिला होता. यामुळे पोलिसांवर दबाव आला व शेवटी त्यांना अटक करावी लागली. वाळपई पोलिसांच्या एकूण भूमिका बदलण्याच्या प्रकाराविरोधात गोरक्षा अभियानाने संताप व्यक्त केलेला आहे. यापुढे अशा प्रकारची पोलिसांची भूमिका खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा हनुमंत परब व इतरांनी दिलेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.