Sangli News : आटपाडी-करगणी मार्गावर भीषण कार अपघात, 1 ठार 4 जखमी
भरधाव कार मेटकरवाडी येथे पलटी
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील भिवघाट ते करगणी या मार्गावर आलिशान गाडीच्या झालेल्या अपघातात रिहान जमीर मुल्ला (बय १६ रा. करगणी ता. आटपाडी) हा ठार झाला. या भीषण अपघातात चारजण जखमी झाले आहेत.
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील रिहान हा आपल्या अन्य नातेवाईकांसह खरसुंडी येथे गाडीच्या कामानिमित्त गेला होता. जग्बार कंपनीची आलिशान कार (एमएच १४ डीएफ ९००९) मधील ही सर्व मंडळी खरसुंडीहून नेलकरंजीमार्गे घरी करगणीकडे परतत होती. शनिवारी रात्री भरधाव कार
मेटकरवाडी बसस्थानकाजवळील दुकान गाळ्यांच्या भिंतीलगत धडकली.
या भीषण धडक आणि गतीमुळे कार हवेत उडून पलटी खाऊन रस्त्याखाली असणाऱ्या खोल खड्यात पडली. भरधाव कारच्या धडकेत मागील सीटवर बसलेला रिहान जमीर मुल्ला हा गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर गाडीतील चौघे गंभीर झाले. या अपघातात एकाचा बळी जाण्याच्या घटनेने करगणीतील मुल्ला कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरली.