For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, १० जखमी

12:02 PM Apr 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
ऊस तोडणी कामगारांचा भीषण अपघात  चौघांचा मृत्यू  १० जखमी

ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे.

Advertisement

सदरची घटना नागपूर- रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजता घडली. या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते,येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला.

मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा.शिरनांदगी, जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17,निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि 11 जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
×

.