कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : अणदूर जवळ क्रूझरचा भीषण अपघात, 4 मृत्यू तर 5 जखमी

05:00 PM Nov 23, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                       तुळजापूर तालुक्यात भीषण क्रूझर अपघात

Advertisement

उमरगा : तुळजापूर तालुक्यातील अणदूर नजीक शनिवारी सकाळी भीषण घटना घडली आहे. अणदूर येथील हॉटेल नॅशनल (उमरगा चिवरी पाटी) जवळ धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी सोलापूर नजीकच्या कासेगाव-उळे येथील आहेत

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरून जाणारी एक क्रूझर जीप हॉटेल नॅशनल जवळ आली असता, अचानक गाडीचे टायर फुटले. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीतील ३ महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement
Tags :
#FatalAccident#HIGHWAYACCIDENT#RoadTragedyAndurCruiser AccidentCruiserJeepAccidentHighwayCrashTrafficSafetyTragicIncident
Next Article