Sangli News : जत तालुक्यात भीषण अपघात; कंटेनर–दुचाकीची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू
पंढरपूर–अथणी राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची धडक
जत : जत तालुक्यातील पंढरपूर- अथणी राष्ट्रीय महामार्गवरील शेगावच्या हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर कंटेनर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामन्ना संगाप्पा हतळी (वय २५, मूळ रा. चिकलगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सचिन गणेश व्हनमाने (वय २१, रा. शेगाव, ता. जत) असेमृत तरुणांची नावे असून गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत जत पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेनंतर जतदाखल होते. पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले होते. पोलीस तत्काळ घटनास्थळीपोलिसांकडून व घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी, कामन्ना हतळी व सचिन व्हनमाने हे कंटेनर चालक आहेत.
मृत हत्तळी याच्या मोठ्या भावाचे शुक्रवारी गावी लग्न असल्याने तो शेगाव येथील पेट्रोल पंपावर माल भरलेला कंटेनर लावला होता. तरहत्तळी त्याचा मित्र व्हनमाने याला कंटेनर घेऊन चेन्नईला जाण्यास सांगून त्याला शेगावहून पेट्रोल पंपावर सोडण्यासाठी निघाला होता. दरम्यान, जतहून सांगोल्याच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर दोघांचा समोरासमोर अपघात होऊन यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.