महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ॲडलेडमध्येही फास्ट बॉलर्सचा दबदबा राहणार

06:58 AM Dec 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुसऱ्या टेस्टमध्येही खेळपट्टीवर हिरवेगार गवत : क्युरेटरचा खुलासा : रोहित-गिलचे पुनरागमन पक्के

Advertisement

वृत्तसंस्था/ ॲडलेड

Advertisement

प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासन ॲडलेड येथे खेळवला जाणार आहे. हा डे-नाईट कसोटी सामना पिंक बॉलने (गुलाबी चेंडू) खेळवला जाईल. हा सामना सुरु होण्यापूर्वी ॲडलेडच्या खेळपट्टीवर हिरवेगार गवत दिसत असल्याचे चित्र समोर आले आहे. अर्थात, ही खेळपट्टी पाहता फलंदाजांना येथे फलंदाजी करणे सोपे नसेल, असा अंदाज बांधला जात आहे. खेळपट्टीवर भरपूर गवत दिसत असून खेळपट्टी हिरवीगार ठेवण्यासाठी त्यावर भरपूर पाणी टाकले जात आहे. यामुळे दुसऱ्या कसोटीतही वेगवान गोलंदाजांना भरपूर स्विंग आणि बाऊन्स मिळू शकतात.

पर्थ कसोटी सामना 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर भारतासमोर आता पिंक बॉलचे (गुलाबी चेंडू) आव्हान असणार आहे. पिंक बॉलने क्रिकेट खेळण्यात कांगारुंचा आतापर्यंत वरचष्मा राहिला आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन संघाने 12 पिंक कसोटी सामन्यापैकी 11 सामन्यात विजय मिळवलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना पराभूत करणे भारतासाठी सोपे नसेल. 2020 मध्ये उभय संघात पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियावर टीम इंडियावर 8 गडी राखून विजय मिळवला होता. 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत टीम इंडिया मागील कटू आठवणी पुसण्यासाठी प्रयत्नशील असेल, हे निश्चित.

खेळपट्टीवर गवत, क्युरेटरची माहिती

ॲडलेडच्या खेळपट्टीवर वेग आणि चांगला बाऊन्स सेट करत आहे. यामुळे पहिल्या सत्रापासूनच चेंडूला उसळी मिळणार असून वेगवान गोलंदाजांना याची खूप मदत होईल. साधारणपणे खेळपट्टीवर 7 मिमी पर्यंत गवत सोडण्यात आले आहे. खेळपट्टी हिरवीगार राहण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. याशिवाय, अवजड अशा रोलरने पिच व इतर भागाची योग्यरित्या देखभाल करण्यात येत असल्याचे ॲडलेड ओव्हल खेळपट्टीचे क्युरेटर डॅमिन हॉग यांनी सांगितले. दरम्यान, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्याकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्यामुळे हा सामना नक्कीच रोमांचकारी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अश्विन-जडेजाला संधी मिळण्याची शक्यता कमी

कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाने दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होणार आहेत. पर्थ कसोटीत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वेगवान गोलंदाज, एक वेगवान अष्टपैलू आणि एक फिरकी अष्टपैलूसह मैदानात उतरली होती. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसले नाहीत. आता ॲडलेड पिंक बॉल कसोटीही वेगवान गोलंदाजांना पोषक असल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे या कसोटीत अश्विन आणि जडेजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रोहित, शुभमन गिलचे पुनरागमन पक्के

पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळला नव्हता, त्यावेळी तो मुंबईत होता. मात्र आता त्याने पुनरागमन केले आहे. यामुळे रोहितचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होणार आहे. रोहितसोबत गिलचेही पुनरागमन पक्के मानले जात आहे. दुखापतीमुळे शुभमन पहिली कसोटी खेळू शकला नव्हता. आता त्याने पण पुनरागमन केले आहे. सराव सामन्यात गिलने 50 धावांची खेळी केली. याशिवाय, पीएम इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणाने चार बळी घेत आपली ताकद दाखवून दिली. ॲडलेड कसोटीत हर्षितचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, गिल व रोहितच्या पुनरागमनामुळे देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेलला नारळ मिळण्याची शक्यता आहे.

तिसऱ्यांदा फायनल गाठण्याची भारताला संधी

आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन फायनलचे आयोजन आयसीसीने केले आहे. दोन्ही वेळा टीम इंडियाने फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, टीम इंडियाने आतापर्यंत एकही फायनल जिंकलेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा न्यूझीलंड आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाकडून फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय म्हणजे इतर संघांवर अवलंबून न राहता स्थान मिळवायचे असेल, तर 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने सामने जिंकणे आवश्यक आहे. या परिस्थितीत टीम इंडिया थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे. पण, टीम इंडियाने बॉर्डर गावसकर मालिका 3-1 किंवा 3-2 ने जिंकली तर त्यांना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसारख्या संघांच्या जय-पराजयावर अवलंबून रहावे लागणार आहे. तसेच ही मालिका भारतीय संघाने 2-2 अशी अनिर्णीत राखली तरीही त्यांना अंतिम फेरीत जाण्यासाठी आफ्रिका आणि श्रीलंकेवर अवलंबून रहावे लागेल.

पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारुंचे तगडे रेकॉर्ड, टीम इंडियाही दमदार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलवर होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार असून जो गुलाबी चेंडूने 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल. पिंक बॉल क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी मायदेशात उत्कृष्ट राहिली आहे, परंतु संघाला अद्याप परदेशी भूमीवर विजयाची चव चाखता आलेली नाही. भारताने आतापर्यंत गुलाबी चेंडूने 4 कसोटी खेळले आहेत, ज्यामध्ये तीन सामने मायदेशात आणि एक सामना परदेशात खेळला गेला. या चार सामन्यांपैकी, भारताने तीन जिंकले आहेत, परंतु 2020 मध्ये ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव परदेशातील पिंक बॉल कसोटीत संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने 2020 मध्ये ॲडलेडच्या या मैदानावर पिंक बॉल टेस्ट खेळली होती, ज्यामध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर गडगडला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे, जी विसरणे कठीण आहे. ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी सोपे नसेल. पण पर्थमधील 295 धावांच्या विजयाने भारत यावेळी इतिहास रचण्याच्या इराद्याने आल्याचे दाखवून दिले आहे.

पिंक बॉल कसोटीत संघांची कामगिरी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article