महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताकडून नववर्षारंभी वेगवान माऱ्याचा सराव

06:22 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विराट कोहलीने नांद्रे बर्गरला तोंड देण्याच्या दृष्टीने केली तयारी, श्रेयस अय्यरचा कमकुवत दुव्यावर सराव

Advertisement

वृत्तसंस्था/ केपटाऊन

Advertisement

पहिल्या कसोटीत दणदणीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकी वेगवान माऱ्याचा सामना करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. सोमवारी येथे जाळ्यात विराट कोहली दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज नंद्रे बर्गरचा सामना करण्याच्या दृष्टीने सराव करताना दिसला, तर आखडू टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना श्रेयस अय्यरच्या समस्या कायम असल्याचे दिसून आले.

नवीन वर्षाचा पहिला दिवसही कोहलीसाठी नेहमीप्रमाणे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणारा राहिला. त्याचे विस्तारित सराव सत्र सुमारे तासभर चालले. प्रथम त्याने मध्यवर्ती जाळ्यात गोलंदाजांचा सामना केला आणि नंतर त्याने सुमारे 20 ते 25 मिनिटे उच्च तीव्रतेच्या ‘थ्रोडाउन’चा सामना केला. कोहली विशिष्ट उद्देशाने जाळ्यात सरावासाठी येण्याकरिता ओळखला जातो आणि सोमवारी त्याला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविऊद्ध मोठ्या प्रमाणात फलंदाजी करायची आहे हे स्पष्टपणे जाणवले. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांत डावखुऱ्या गोलंदाजाचा समावेश नसल्यामुळे  ‘नेट बॉलर’ला बोलावण्यात आले आणि कोहलीने त्याच्या 25 ते 30 चेंडूंचा सामना केला.

यादरम्यान तो जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आवेश खान यांच्या गोलंदाजीलाही सामोरा गेला. कोहली काही वेळा पुढे सरसावून मिड विकेटमधून फटके हाणताना दिसला. तथापि, येथे फक्त समस्या वेगाच्या बाबतीत राहिली. ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ने उपलब्ध केलेला तरुण गोलंदाज हा वेगाच्या बाबतीत बर्गरच्या तुलनेत बराच कमी होता. बर्गरने सेंच्युरियन येथे पहिल्या कसोटीत पदार्पणातच सात बळी घेतले होते. ‘नेट बॉलर’ला तितका वेग नसल्यामुळे कोहलीला त्याचा इनस्विंग ओळखण्यास आणि पुढे सरसावून मिड विकेटमधून फ्लिक करण्यास वेळ मिळाला. मात्र प्रत्यक्ष सामन्यात कोहलीला ‘फ्रंट फूट’वर येण्यासाठी इतका वेळ मिळणार नाही.

आखडू टप्प्याच्या चेंडूंचा सामना करण्याच्या बाबतीत श्रेयस अय्यरच्या कमकुवतपणावर एकदिवसीय विश्वचषकादरम्यानच प्रश्न उपस्थित झाला होता. सेंच्युरियनमधील कसोटीने पुन्हा एकदा उसळत्या चेंडूविरुद्धच्या त्याच्या उणीवा उघड केल्या. कंबरेच्या वर उसळणाऱ्या कोणत्याही चेंडूचा सामना करताना त्याला गंभीर समस्या भेडसावतना दिसल्या. श्रीलंकेचा डावखुरा गोलंदाज नुवान सेनाविरत्ने याने 18 यार्डांवरून एकदा चेंडू टाकला असता तो अय्यरने उशिरा पूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चेंडू त्याच्या पोटावर आदळला. त्यामुळे थोड्या काळासाठी त्याने फलंदाजी थांबवली. त्यानंतर तो पुन्हा सरावास आला असता तिन्ही थ्रोडाउन तज्ञांनी त्याला 18 यार्डांवरून गोलंदाजी केली आणि तो त्यांचा सामना करताना एकदाही खंबीर दिसला नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article