For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फारुख इंजिनीयर, क्लाईव्ह लॉईड सन्मानित

06:15 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
फारुख इंजिनीयर  क्लाईव्ह लॉईड सन्मानित
Advertisement

वृत्तसंस्था / मँचेस्टर

Advertisement

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी लँकेशायर काऊंटी क्रिकेट क्लबने भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीयर आणि वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लाईड यांचा स्टँड्सला नाव देऊन सन्मानित केले.

1968 ते 1976 पर्यंत लँकेशायरचे प्रतिनिधीत्व करणारे यष्टिरक्षक फलंदाज असणाऱ्या इंजिनीयर यांनी 175 सामन्यांत 5942 धावा, 429 झेल आणि 35 यष्टिचीत केले. त्यांचे आगमन क्लबसाठी एक टर्निंग पॉईंट ठरले. 15 वर्षांच्या जेतेपदाच्या दुष्काळानंतर 1970 ते 1975 दरम्यान त्यांच्यामुळे चार वेळा जिलेट कप जिंकण्यास क्लबला मदत झाली. भारतीय क्रिकेटशी त्यांचे खोल संबंध असूनही, मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये इंजिनीयर यांचे तेथे त्यांच्या नावाने एकही स्टँड नाही.

Advertisement

दोनवेळा विश्वचषक विजेता कर्णधार लॉईड 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला परदेशी खेळाडू म्हणून लँकेशायरमध्ये सामील झाले. लँकेशायरच्या क्रिकेट भवितव्याला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लॉईड यांचा क्लबशी असलेला दोन दशकांचा संबंध परिवर्तनकारी होता. हा उपक्रम इंजिनियर आणि लॉईड दोघांनीही या काऊंटीमध्ये दिलेल्या योगदानाला प्रतिबिंबित करतो. इंग्लिश स्थानिक क्रिकेटमधील त्यांचा वारसा साजरा करतो. 87 वर्षांचे इंजिनियर, निवृत्तीनंतर मँचेस्टरला आपली मायभूमी बनवली असून सध्या ते येथेच राहत आहेंत.

Advertisement
Tags :

.