For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फारुक अहमद बीसीबीचे नवे अध्यक्ष

06:22 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
फारुक अहमद बीसीबीचे नवे अध्यक्ष
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार फारुक अहमद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे निकटवर्ती असलेले नझमुल हसन यांनी देश सोडल्यामुळे त्यांच्या जागी बीसीबी अध्यक्षपदी अहमद यांची निवड करण्यात आली.

बांगलादेशमधील अस्थिरतेचा खेळावरही परिणाम झाला असून बीसीबीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निझामउद्दिन चौधरी यांनी, नझमुल हसन यांनी आपल्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे पत्र पाठविले आहे. शेख हसिना यांच्या कारकिर्दीत ते क्रीडा मंत्रीही होते. त्यांची राजीनामापत्र स्वीकारण्यात आले असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.