महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फारुक अब्दुल्लाही काश्मीरमध्ये स्वबळावर; ‘इंडिया’ आघाडीला गळती सुरूच

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया’ आघाडीला गळती सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था /श्रीनगर

Advertisement

नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनीही इंडिया आघाडीचा ‘हात’ सोडला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला सतत धक्के बसत आहेत. आधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही पंजाब आणि दिल्लीत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. आता या ‘इंडिया’ आघाडीला जम्मू-काश्मीरमध्येही मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री फाऊक अब्दुल्ला यांनी आपला पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. फाऊक अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जागांवरही निवडणुका होऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली आहे. यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये छुपी युती केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही छुपी युती आणि संपूर्ण देशासाठी तयार झालेली इंडिया आघाडी तुटताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि भाजप असे चार गट आहेत. अनेकवेळा या पक्षांनी आपापसात युती करून सत्ता स्थापन केली आहे.

आम्ही ‘इंडिया’सोबत : ओमर अब्दुल्ला

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फाऊक अब्दुल्ला यांच्या घोषणेनंतर माजी मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आपला पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा सदस्य असल्याचे नमूद केले. जागा वाटपावर आम्ही स्पष्ट असून भाजपच्या ताब्यात असलेल्या जागांवर चर्चा होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून जागा परत घेणे हे आमचे मोठे उद्दिष्ट असल्यामुळे एनसीने काँग्रेससोबत जागा वाटून घेणे आवश्यक आहे. काँग्रेससाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

अद्याप काँग्रेससोबत चर्चा नाही : उमर

काँग्रेससोबत जागावाटपाबाबत आमची अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही. सध्या प्राथमिक पातळीवर काही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली असली तरी त्याला अंतिम स्वरुप आलेले नाही, असेही ते म्हणाले.

पंजाबमध्ये आप-काँग्रेस बोलणी फिस्कटली

पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस यांच्यात युतीबाबत चर्चा होऊ शकली नाही. इंडिया आघाडीच्या सर्व बैठकांमध्ये एकत्र दिसणाऱ्या आप आणि काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा केली आहे. पंजाबपाठोपाठ आता दिल्लीत ‘आप’ काँग्रेसला जास्त जागा देण्याच्या बाजूने अनुकूल नसल्यामुळे दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा मुद्दा बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. ‘आप’ने दिल्लीत जागावाटपाचा प्रस्ताव जाहीर केला. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी आम आदमी पक्ष सहा जागांवर निवडणूक लढवणार असून काँग्रेससाठी एक जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article