For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड भागात चार दिवसात दोनवेळा शेतवडी तुडुंब

10:12 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड भागात चार दिवसात दोनवेळा शेतवडी तुडुंब
Advertisement

अतिपावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप

Advertisement

वार्ताहर /नंदगड

नंदगड, बेकवाड, हलशी परिसात गेल्या चार दिवसात दोनवेळा मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतवडीत व सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाण्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर्षी जून महिना सुरू होताच मंगळवार दि. 4 रोजी सकाळी या भागात मोठा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणी साचले होते. याच दिवशी पुन्हा दुपारनंतर प्रखर ऊन पडले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारी शेतवडीतील पाणी आटले होते. भाताच्या उगवणीसाठी व उगवलेल्या भाताला वाढीसाठी पाऊस पोषक ठरला होता. याच भागात गुरुवारी दुपारी तब्बल दोन तास मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पुन्हा शेतवडीत पाणी साचले आहे. पावसामुळे गटारीत साचलेली घाण व कचरा वाहून गेला आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.