For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीसाठी शनिवारी रवाना होणार शेतकरी

06:47 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीसाठी शनिवारी रवाना होणार शेतकरी
Advertisement

 शंभू सीमेवरून सरवन सिंह पंढेर यांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शंभू सीमेवर ठाण मांडून असलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्ली कूचची घोषणा केली आहे. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आता आम्ही 14 डिसेंबर रोजी दिल्लीच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या निदर्शकांना 303 दिवस पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणालाही 15 दिवस झाले आहेत. आम्ही नेहमीच चर्चेचे स्वागत केले असून सरकारकडून आमच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधण्यात आलेला नाही असे पंढेर यांनी म्हटले आहे.

Advertisement

14 डिसेंबर रोजी 101 शेतकऱ्यांची तुकडी रवाना करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे. शेतकरी आंदोलनाच्या यशासाठी आम्ही बुधवारी प्रार्थना करणार आहोत. निदर्शनांदरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मुक्ततेची आम्ही मागणी करतो असे पंढेर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनर अंतर्गत 101 शेतकऱ्यांच्या तुकडीने 6 आणि 8 डिसेंबर रोजी पायी दिल्लीच्या दिशेने जाण्याचे दोन प्रयत्न केले होते. परंतु हरियाणाच्या पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यादरम्यान शेतकरी आणि पोलिसांदरम्यान संघर्षसदृश स्थिती निर्माण झाली, यामुळे शेतकऱ्यांना मागे ढकलण्यासाठी अश्रूधूराचा वापर करण्यात आला. यादरम्यान अनेक शेतकरी जखमी देखील झाले.

सुरक्षा दलांकडून दिल्लीच्या दिशेने काढण्यात येणारी रॅली रोखण्यात आल्यावर 13 फेब्रुवारीपासून शेतकरी संघटना पंजाब आणि हरियाणादरम्यानच्या शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून आहेत. पिकांसाठी एमएसपीच्या कायदेशीर हमी, शेतकरी कर्ज माफी, शेतमजुरांसाठी पेन्शन, वीजदरात वाढ न करणे, गुन्हे मागे घेण्s आणि 2021 मधील लखीमपूर खीरी हिंसा पीडितांसाठी न्यायाची मागणी शेतकरी संघटना करत आहेत.

Advertisement

.