शक्तिपीठ महामार्ग रद्द करा' शेतकऱ्यांनी दिला सरकारला इशारा
सांगली
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा' या मागणीसाठी सांगलीत शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभाग नोंदवला. अंकली येथे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी " राज्याचे मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेत, शक्तीपीठ महामार्ग करणार आहोत. या महामार्गाला ज्या ठिकाणी विरोध आहे त्याठीकाणी अलायमेंट बदलणार आहोत, असे त्यांनी सांगितले. परंतु सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे. आम्ही शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. हा महामार्ग जर रद्द केला नाही तर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू. राज्य शासन जमीन अधीग्रहण हे १९५५-५६ च्या कायद्यानुसार करायला लागलेलं आहे. या कायद्यानुसार शेतकऱ्यांना कोणताही अधिकार नाही आहे. सरकार एकतर्फी जमीनीचं अधिग्रहण करू शकतं. जमिनीचं मुल्यांकनही एकतर्फी करू शकतात, त्यावर आक्षेप घेण्याचाही हक्क शेतकऱ्यांकडे या कायद्यानुसार नाही. २०१३ च्या जमिन अधिग्रहण कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. या महामार्गाला समर्थन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन किती पैसे देणार असल्याचेही सांगितले नाही आहे. आम्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कींवा पालकमंत्र्याच्या दारात पुढचे आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला. याप्रसंगी सतिश साकळकर उमेश देशमुख सह आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना अटक करण्यात आले.