Solapur : सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; मदतनिधीत विलंबामुळे संतप्त शेतकरी
सोलापुरात शेतकऱ्यांच्या मदतनिधी वितरणात अडचणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना ८६७ कोटी रुपयांचा मदतनिधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत केवळ १ लाख २२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतनिधी जमा झाला आहे. शेतकऱ्यांचा फॉर्मर आयडी नसणे, ई केवायसी नसणे आदी कारणामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडचण निर्माण होत आहेत.
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे नुकसान झालेल्या ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एकूण ८३७ कोटी ३७लाख ६३ हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १ लाख २२ हजार ४४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४० कोटी ७९ लाख ४० हजार रुपये निधी जमा झाला आहे.
जिल्ह्यातील ४ लाख २६ हजार २९५ शेतकर्यांचे एकूण ५०९ कोटी ८४ लाख रुपयांचा मदतनिधी तहसील पातळीवरुन मंजूर करण्यात आला असून यानिधीचे वितरण बँक खात्यात सुरु असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत वाटप करताना बाधित शेतकऱ्यांचा फॉर्मर शेतकऱ्यांना मदत लवकर वितरीत आयडी असणे आवश्यक आहे. होईल. फॉर्मर आयडी नसलेल्या जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांना मात्र ई केवायसी फॉर्मर आयडी आहेत. त्यामुळे केल्यानंतरच मदतनिधी मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य शासनाने दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळी सरल्यानंतरही सात लाखापैकी केवळ एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत निधी आल्याने शेतकऱ्यांकडून ओरड होत आहे.
शेतकऱ्यांना मदतनिधी वाटप करताना ई केवायसी किंवा फॉर्मर आयडीची सक्ती करण्यात येणार नाही, असेही आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले होते. मात्र मदतनिधी बाटपात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी फॉर्मर आयडी किंवा ईकवायसी आता शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदतनिधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.