For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा

10:38 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा
Advertisement

काकती ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी योजनांबाबत माहिती

Advertisement

वार्ताहर/काकती

जनावरांच्या शेड बांधकामासाठी नरेगातून 57 हजार रुपयांच्या अनुदानाचा शेतकरी व महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी केले आहे. ग्राम पंचायत कार्यालयात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात महिलांशी चर्चा करताना त्या बोलत होत्या. केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विशेष ग्रामीण भागातल्या एका पात्र कुटुंबाला अनुदान (सबसीडी) देऊन वैयक्तिक कामे करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा उपयोग करून अनुदानाचा लाभ घेता येतो. यापूर्वी सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी 19 हजार 500 रुपये अनुदान मिळत होते. तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना 43 हजार रुपये अनुदान मिळत होते. मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांसाठी 57 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Advertisement

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मनरेगाचे जॉब कार्ड असणे महत्त्वाचे आहे. 18 वर्षांवरील व 65 वर्षे वयाच्या आतील कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक, फोटो सादर करून जॉबकार्ड घ्यावे. किमान चार जनावरे पाळणारे जॉबकार्डधारकच गोठ्याच्या अनुदानासाठी पात्र आहेत. अशा शेतकऱ्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरे पाळलेल्या उपस्थितांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असून फॉर्म क्रमांक 6 मध्ये ग्रा.पं.कडे माहिती सादर करावी. ‘शासनाच्या योजना आपल्या दारी’ या संकल्पनेतून आपली ग्राम पंचायत वेळोवेळी योजनांची माहिती सर्वप्रथम देते. त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे मुचंडीकर म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.