For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांच्या रॅलीला नोएडात रोखले

07:00 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांच्या रॅलीला नोएडात रोखले
Advertisement

दिल्लीकडे कूच करण्यासाठी आंदोलक आग्रही : सीमेवर चक्काजाम

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली, नोएडा

Advertisement

नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गुऊवारी दिल्लीकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-नोएडा, चिल्ला सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक शेतकरी नेत्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरू होते.  शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी सेक्टर-6 उद्योग मार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवर अंशत: निर्बंध घातले होते. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली-नोएडा चिल्ला सीमेवरून संसदेकडे मोर्चा काढला. नोएडा ते दिल्लीचा मार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे.

गुरुवारी सकाळी महामाया उ•ाणपुलाखाली शेकडो शेतकरी एकत्र झाले होते. ते सर्वजण दिल्लीला जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना सीमेवर अटकाव करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत हेही निदर्शनात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये गुरुवारपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यामुळे नोएडा आणि दिल्लीतील अनेक मार्गावर वाहतुकीवर परिणाम दिसून आला. वाहतूक कोंडीमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सीमा 24 तासांसाठी सील करण्यात आल्या आहेत. सर्व सीमेवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.