‘उसाच्या हमीभाव’साठी आज शेतकऱ्यांचे धरणे
बेळगाव : उसाला हमीभाव जाहीर करावा, या मागणीसाठी गुऊवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे करून जिल्हाधिकाऱ्य़ांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती रयत संघ-हरित सेनेचे राज्य अध्यक्ष सुरेश परगण्णवर व मानद अध्यक्ष राघवेंद्र नायक यांनी बुधवारी (दि.29) पत्रकार परिषदेत दिली. बेळगाव जिह्यातील कारखान्यांनी अद्याप उसाला दर जाहीर केलेला नाही. सरकारही दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांप्रमाणे कर्नाटकातील कारखान्यांनी दर द्यावा, अशी मागणी असून, रयत संघ-हरित सेनेतर्फे गुऊवारी आंदोलन करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते व अतिवाड येथील शेतजमिनी सरकारने संपादन केलेल्या असून, शेतकऱ्यांना अद्याप भरपाई दिलेली नाही.
14 वर्षे सरकारकडून दखल नाही
भरपाई मिळविण्यासाठी गेल्या 14 वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असूनही सरकारने दखल घेतलेली नाही, अशी तक्रार राज्य अध्यक्ष परगण्णवर यांनी मांडली. पत्रकार परिषदेला गजानन सुतार, सातेरी केसरकर, विठ्ठल कालकुंद्रीकर यांसह इतर उपस्थित होते.