For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा! इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याची प्रमुख मागणी

03:48 PM Oct 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा  इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्याची प्रमुख मागणी
Farmers march Ratnagiri Collectorate
Advertisement

शासनाने विचार न केल्यास आझाद मैदानावर विराट मोर्चा ने धडकणार

Advertisement

झाडे आमच्या मालकीची, नाही कोणाच्या बापाची, रद्द करा रद्द करा ५० हजार रुपये दंड रद्द करा, अशा शेतकऱ्यांच्या गगनभेदी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून निघाला. इको सेन्सिटिव्ह झोन अंतर्गत असलेल्या जाचक अटींच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शेतकरी आज एकवटला आणि मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांवर धडकला.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=kXI1LLSrtXU[/embedyt]

Advertisement

जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या. शासनाने एखादे झाड तोडल्यास एका झाडाला ५०,००० रूपये दंडात्मक कारवाई केली जाईल असा फतवा काढला आहे. यातून सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येणार आहे. यामुळे आमचा या ५०,००० रुपये दंडात्मक काय‌द्याला सर्व शेतकऱ्यांचा याला कडाडून विरोध केला आहे. अशा काय‌द्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जाईल. शेतकरी १०० टक्के अडचणीत येईल म्हणून शांसने काढलेली आदी सुचना जशीच्या तशी मागे घेण्यात यावी अशी मागणी आहे. येथील लोकप्रतिनिधी यांनीही याचा गांभीर्याने विचार करावा असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात वन क्षेत्रावर 99 टक्के मालकी ही शेतकऱ्याची आहे आणि 1 टक्का वन क्षेत्र आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार हा निर्णय असून त्याबद्दल शासनाचा जाहीर निषेध या शेतकऱ्यांनी यावेळी जाहीर निषेध केला.

Advertisement
Tags :

.